यवतमाळ : सोन्याचं आकर्षण भारतामध्येच नव्हे तर जगामध्ये आगळे वेगळे आहे. जगामध्येच
नव संशोधनाच्या दृष्टिकोनातून आणि सोन्याच्या एकूण ऐतिहासिक संदर्भ देता सोन्याची शोध
मोहीम तथागत भगवान गौतम बुद्धांच्या काळामध्ये गतिमान झाली असा दावा गोल्डन
मॅन रोहित पिसाळ यांनी केला आहे. यवतमाळ-नागपूर मार्गावरील चापर्डा येथील ‘झानभूमी’
येथे आज रोहित पिसाळ यांनी भेट दिली. या प्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलतांना रोहित पिसाळ म्हणाले
की, विद्यमान स्थितीत तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचारांची समाजाला
नितांत गरज असून जगामध्ये शांतता आणि सुव्यवस्था नांदावी याकरिता आता तथागताच्या सम्यक
मार्गाची गरज प्रत्येक घरातील कुटुंबाला आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीला जर तुम्हाला
शारीरिक बौद्धिक आणि सामाजिक तंदुरुस्त करायचे असेल तर बुद्धाच्या मार्गाशिवाय पर्याय
नाही. असे त्यांनी स्पष्ट केले.
कोण आहेत रोहित पिसाळ
जगविख्यात असणाऱ्या तीन कंपन्यांपैकी सोन्याच्या एका कंपनीचे रोहित पिसाळ हे मालक आहे. आज नागपूर रोडवरील चापर्डा येथील ज्ञान भूमीला त्यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी आपले अनुभव झानभूमी परिवाराशी शेअर केले आहे.
डॉ. अशोक बोधींनी केले स्वागत
सर्वप्रथम त्यांचे स्वागत डॉ.
अशोक बोधी यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार बळी खैरे
यांचे चित्र भेट देण्यात आले. याप्रसंगी प्रकाश बोधी, सुरेश वानखडे (धामणगाव रेल्वे),
अंकुश वाकडे, एड. अरुण मोहोड, एड. नरेंद्र मेश्राम, नितेश मेश्राम तथा उपासकांची उपस्थिती
होती.
0 Comments