यवतमाळ : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प
सादर केला आहे. या अर्थसंकल्पात कही खुशी, कभी गम असा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रीया
सत्ताधारी व विरोधकांकडून उमटत आहे.
सर्व घटकांना सामावून घेणारा अर्थसंकल्प : पालकमंत्री
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री
निर्मला सीतारामन यांनी आज शनिवारी सादर केलल्या अर्थसंकल्पात १२ लाख रूपयांपर्यंतचे
उत्पन्न करमुक्त करून मध्यमवर्गीय करदारत्यांना सुखद धक्का दिला. सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, नोकरदार, शेतकरी, महिला, विद्यार्थी या
सर्व घटकांच्या हिताचे निर्णय घेवून केंद्र सरकारचा हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याची
प्रचिती दिली, अशी प्रतिक्रिया राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री
संजय राठोड यांनी दिली आहे. नव्या कररचनेमुळे वार्षिक १२ लाख उत्पन्न असलेल्या करदात्यांचे
उत्पन्न शंभर टक्के करमुक्त होणार आहे. शेतकरी, महिला यांनाही
करमुक्त उत्पन्न मिळणार आहे. शेतकरी, महिला, युवक, कष्टकरी वर्गासाठी
विविध योजना या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आल्या. महिलांसाठी कौशल्याविकासाच्या योजनांवर
भर दिला आहे. पंतप्रधान धनधान्य योजनेत शेती उत्पादनात वाढ, शेतमाल साठवणूक
क्षमता आणि सिंचन व क्रेडीट सुविधांवर अधिक भर देण्यात आल्याने शेती विकासासह ग्रामीण
विकासाला चालना मिळणार आहे. एकूणच या अर्थसंकल्पात देशातील सर्व स्तरातील नागरिकांच्या
सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रगतीचा सुक्ष्म
विचार करून देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्याचा यशस्वी प्रयत्न अर्थमंत्र्यांनी
केला आहे. विकसित, स्वयंपूर्ण, सक्षम आर्थिक महासत्ता
बनण्याकडे भारताची झपाट्याने वाटचाल सुरू असल्याची प्रचिती आजच्या अर्थसंकल्पातून जगाला
आली आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.
शेतकरी, कष्टक-यांच्या हिताचा विचार केला नाही : आ. मांगुळकर
केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकरी, कष्टकरी सर्वांच्या हिताचा विचार करण्यात आलेला नाही, अशी प्रतिक्रीया आ. बाळासाहेब मांगुळकर यांनी दिली. पायाभूत सुविधांसाठी कोणतीही तरतूद नाही. अर्थसंकल्पात उद्योग, बेरोजगारी, शेतकरी, युवक या सर्वांना बाजूला ठेवले आहे. अर्थसंकल्पात ठराविक वर्गालाच लाभ होईल. शेतक-यांच्या दृष्टीने कोणतीही तरतूद नाही असे देखील आ. मांगुळकर म्हणाले.
मानधनवढीसाठी कुठलीच तरतूद नाही : कॉ. दिवाकर नागपूरे
केंद्रीय अर्थसंकल्पात योजना कर्मचारी यांचे मानधन वाढीसाठी कुठलीच
तरतूद करण्यात आली नाही राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत
कार्यरत आशा असो गटप्रवर्तक असो की अंगणवाडी
सेविका असो , शालेय पोषण आहार कर्मचारी असो यांच्या मानधनात वाढ करण्या करीता
कुठलीच तरतूद करण्यात आली नसुन केंद्र सरकारने योजना कर्मचारी यांचे तोंडाला पाने पुसली
आहे. योजना कर्मचारी यांचे मोबदल्यात सन २०१८
पासून कोणतीच आर्थिक मानधनवाढ केली नाही अशी प्रतिक्रीया कॉ. दिवाकर नागपुरे, जिल्हा कार्याध्यक्ष, आयटक यांनी दिली.
कृषीसंकट कमी करणारा अर्थ संकल्प : किशोर तिवारी
भारताच्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या
भारतीय अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. लागवडी खर्चाचे
नियमन, उत्पादकता वाढविण्यासाठी कापूस अभियानाची सुरुवात व तेलबियांना प्रोत्साहन देणे या मुख्य मुद्द्यांवर
मिशन मोड मध्ये कार्यक्रम सादर करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी
आज 'धन ध्यान कृषी' योजनेची घोषणा केली. यामुळे देशातील १ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मदत
होईल. विदर्भातील कृषीसंकट कमी करणारा हा अर्थसंकल्प
असल्याची प्रतीक्रीया शेतकरी स्वावलंबन मिशनचे माजी अध्यक्ष किशोर तीवारी यांनी
दिली आहे.
0 Comments