यवतमाळ : घाटंजी येथील
राजे छत्रपती सामाजिक संस्था व शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिक्षण, कला, क्रीडा, साहित्य, सामाजिक कार्य
व प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विदर्भातील व्यक्तींना या पुरस्काराने
दरवर्षी गौरविण्यात येते. यंदाचा वीर राजे संभाजी पुरस्कार व्यसन मुक्ती सम्राट तथा
प्रबोधनकार मधुकर खोडे यांना जाहीर झाला आहे.
किर्तनातून केली व्यसनमुक्ती
सन १५ मे १९५५ मध्ये शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मधुकर खोडे यांनी संत तुकाराम महाराज, गाडगेबाबा व तुकडोजी महाराजांना आपला आदर्श मानत ग्रामीण भागातील जनतेमध्ये व्यसनमुक्ती व ग्रामसफाईसाठी ५० वर्ष कार्य केले. त्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून दारू, गुटखा, बिडी ,सिगारेट इत्यादी व्यसनांपासून हजारो लोकांची मुक्तता केली. आजही त्यांच्या कार्यक्रम ज्या गावात असतो तेथे सकाळी ग्रामसफाई व व्यसनमुक्तीची झोळी घेऊन ते फिरतात. या माध्यमातून फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर शेजारच्या मध्यप्रदेश, गुजरात ,आंध्र प्रदेश या राज्यातील लोकांनीही आपल्या व्यसनांचा त्याग केला.
शिवजयंती उत्सवात पुरस्कार वितरण
महाराष्ट्र सरकारने दलित मित्र
व सांस्कृतिक पुरस्कारने तर अमरावती विद्यापीठाने ही मधुकर खोडे
यांचा गौरव केला आहे. शेतकरी, काबाडकष्ट करणाऱ्या
हजारो लोकांना व्यसनापासून मुक्त करून सुंदर व निरोगी आयुष्य जगण्याची प्रेरणा देणाऱ्या
त्यांच्या कार्याचा गौरव घाटंजी येथे शिवजयंती उत्सवा दरम्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष
हंसराज अहिर हे राहणार आहे. तर प्रमुख विशेष अतिथी म्हणून खासदार प्रतिभा धानोरकर उपस्थित राहणार आहे. तर आमदार प्रा.
राजू तोडसाम यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे. यावेळी पद्मश्री पुरस्कार प्राप्त नैसर्गिक शेती तज्ञ सुभाष शर्मा, जि. प. चे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, बँकेचे संचालक आशिष लोणकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित
राहणार आहे. या भावपूर्ण सोहळ्याला जास्तीत जास्त शिवप्रेमींनी हजर राहण्याचे
आवाहन शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments