९ आरोपींना अटक : मोरथ येथील घटना : महागाव पोलिसांची कारवाई
यवतमाळ : सध्या झटपट पैसे कमविण्याची
क्रेझ निर्माण झाली आहे. ग्रामिण व शरातील भागात पाच-दहा जण एकत्र येवून गुप्तधन
शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र पहावयास मिळते. अशाच प्रकारातून महागाव तालुक्यातील मोरथ येथे गुप्तधन काढण्याच्या संशयावरून सोनेरी
टोळीचा पर्दाफाश केला. पोलिसांनी ९ आरोपींना अटक केली असून, एक आरोपी फरार आहे. ही घटना आज दि. १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. पुढील तपास महागाव
पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनराज निळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक
मिलींद सरकटे करीत आहे.
सोनेरी टोळीतील आरोपी
उत्कर्ष आनंता माळधुळे वय 24 वर्ष रा साईनगर अमरावती, गौरव प्रभुदास मेश्राम वय 24 वर्ष
रा. लोहारा जि. यवतमाळ, प्रथम नीरज सिंघानिया
वय 25 वर्ष रा. मेन
लाईन यवतमाळ, गौरव अतुल पांडे वय 26 वर्ष रा. टीळकवाडी यवतमाळ, माधव कोंडू नेवारे
वय 36 वर्ष रा. अकोला
बाजार यवतमाळ, योगेश विनोद कपिले वय 25 वर्ष रा. राडगाव अमरावती, प्रकाश भास्कर
सहारे वय 40 वर्ष रा. लोहारा
यवतमाळ, निलेश रामभावजी भोरे वय 34 वर्ष रा. टाकळी जहागीर जि. अमरावती, श्रीकांत वासुदेव
सोनवणे वय 23 वर्ष रा. अकोला
बाजार जि. यवतमाळ, स्वप्निल चक्करवार रा. मोरथ अशी आरोपींची
नावे आहे. त्यापैकी स्वप्निल चक्करवार हा आरोपी फरार असून,
उर्वरीत नउ आरोपींना ताब्यात घेतले आहे.
एक महिन्यापासून गुप्त शोधण्याचा प्लॅन
मोरथ येथील एक कुटुंब यवतमाळ येथे
स्थायिक झाले. मागील महिन्याभरापासून त्यातील एक सदस्य दोन ते तीन दिवस आड अज्ञात इसमांना
घेऊन मोरथ येथे येत होता. त्याची गावातील काही नागरिकांना कुणकुण लागली. आज दुपार दरम्यान
या व्यक्तीने अज्ञात काही नागरिकांना लक्षात आले. घरात ही मंडळी खड्डा करून गुप्तधन
शोधण्याचा प्रयत्न करीत असल्याची प्राथमिक माहिती गावकऱ्यांना मिळाली. त्याआधारे गावकऱ्यानी
घटनेची माहिती महागाव पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांचा ताफा या ठिकाणी येण्याअगोदर ही
टोळी परत जाण्यासाठी निघाली. त्यावेळी पोलिसांनी सवना येथून या टोळीला ताब्यात घेतले.
रुद्राक्षांच्या माळेसह साहित्य व कार जप्त
आरोपींकडून एम एच 27 बि. व्ही 0924 व एम एच 49 बि 5688या दोन कारमधून 9 इसम
आले
होते. महागाव पोलिसांनी शहानिशा करुन दोन वाहन थांबवून वाहनाची तपासणी केली. रुद्राक्षाच्या माळा, लिंबू व कांदा व तीन स्टीलच्या डब्यात हळद-कुंकू
व कापूर असे साहित्य मिळाले आहे.
0 Comments