केंद्रीय वित्त राज्यमंत्र्याच्या हस्ते पुरस्कार प्रदान
हा पुरस्कार केंद्रीय वित्त राज्यमंत्री
ना.पंकज चौधरी, सर्वोच्च न्यायालयाचे
न्यायमूर्ती दिपक वर्मा यांच्या हस्ते गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर
यांना प्रदान करण्यात आला.
राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाचे (एनएसआयसी) अध्यक्ष डॉ.शुभांशु आचार्य,चेंबर ऑफ इंडियन मायक्रो स्मॉल आणि मध्यम उद्योगचे अध्यक्ष मुकेश मोहन,एजियास फेडरल लाइफ इन्शुरन्सचे एमडी ज्युड गोम्स हे उपस्थित होते.हा
पुरस्कार सोहळा इंपिरियल हेरिटेज,जनपथ
दिल्ली संपन्न झाला.
पारदर्शक पद्धतीने तपासणी
केंद्रिय लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या
वतीने देशभारतील बँकिंग व सहकार क्षेत्रात
उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संस्थांची माहिती घेण्यासाठी सर्वोच्च अधिकाऱ्यांची समिती
गठीत करण्यात येत असते. या समितीच्या माध्यमातून अत्यंत पारदर्शक पद्धतीने सर्व कामकाजाची
तपासणी करण्यात आली.या सर्व प्रक्रियेत गोदावरी अर्बन अव्वल ठरल्यामुळे संस्थेला राष्ट्रीय
बँकिंग एक्सलन्स पुरस्काराने गौरविण्यात आले.
मंत्रालयाचे मानले आभार
या पुरस्कारबद्दल संस्थेचे संस्थापक
अध्यक्ष तथा मा.बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष ना.हेमंत पाटील व अध्यक्ष
राजश्री पाटील यांनी केंद्रीय लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे आभार मानले तर संस्थेचे
संचालक,कर्मचारी व सभासदांचे
अभिनंदन केले.
0 Comments