यवतमाळ : शेतातील उस जळुन खाक झाल्याची घटना आज मंगळवारी दिनांक १८
फेब्रुवारी रोजी महागाव तालुक्यातील लेवा या गावात घडली. या आगीत सहा एकरातील उस
जळून खाक झाला असून, आठ लाखाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. काल सोमवारी
काळी टेंभी शिवारातील शेतात आग लागून १ एकरातील उस जळुन खाक झाला होता. आज घडलेली
ही दुसरी घटना आहे.
महागाव तालुक्यातील
लेवा येथील दोन अल्पभूधारक शेतकरी विलास नारायण खंदारे, ज्ञानेश्वर माधव खंदारे या दोन शेतकऱ्यांच्या शेतात उसाला आग
लागली. गावालाच शेत लागून असल्यामुळे गाव पेटण्याचे भीतीपोटी गावकऱ्यांनी
एकत्र येऊन आग विझवली. ही आग
शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याची सदर शेतकरी मालकाने सांगितले. यावर तात्काळ महसूल विभागाचे नायब तहसीलदार राठोड, तालुका
कृषी विभागाचे अधिकारी बॉक्से यांनी घटनास्थळी भेट दिली. झालेल्या
नुकसानीचा पंचनामा करून अहवाल सादर केला आहे.
0 Comments