यवतमाळ : पुसदकडून माहुरकडे जाणा-या
ट्रकने रस्त्याच्या बाजुला असलेल्या पानटपरीला धडक दिली. त्यानंतर ट्रक किराणा
दुकानात घुसला अन् अचानक ट्रकने पेट घेतला. या घटनेत किराणा दुकानात असलेले दोन जण
मलब्याखाली दबले होते. यावेळी अग्निशमन दलासह नागरिकांनी घटनास्थळी
धाव घेवून त्यांनी सुखरुप बाहेर काढले. ही घटना पुसद येथून ११ किमी अंतरावरील कासोळा
येथे दिनांक ४ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
पुसद शहरापासून जवळच
असलेल्या कासोळा फाटा येथे टी. सी. २६ / टी २११३ क्रमांकाचा
ट्रक पुसदकडून माहूर मार्गे जात होता. दरम्यान ट्रकने कासोळा टी पॉईंट जवळील एका पान टपरीला
धडक दिली. त्यानंतर ट्रकने किराणा दुकानाला धडक देवून आत
घुसला. या विचित्र अपघातात किराणा दुकानातील महिला
व पुरुष मलब्याखाली दबले होते. यावेळी नागरिकांसह अग्निशमन
दलाच्या पथकाने त्यांना सुखरुप बाहेर काढले. हा अपघात इतका भयंकर होता की, ट्रकने जागेवर पेट घेतला होता. अग्निशमन दलाने घटनास्थळ गाठून आग आटोक्यात
आणली. या घटनेची माहीती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. यावेळी घटनास्थळावरून ट्रक चालक पसार झाला.
0 Comments