सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री मृन्मयी देशपांडे ‘जगदंबा’त येणार



यवतमाळ : स्थानिक जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षीक स्नेहसंमेलन 'विंग्स २५'चे आयोजन १३ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले. दिनांक १५ फेब्रुवारी ला बक्षिस वितरण सोहळया करीता मराठी चित्रपटसृष्टीची सुप्रसिद्ध सिने तारीका मृन्मयी देशपांडे उपस्थित राहणार आहे. अभिनेत्री मृन्मयी देशपांडे यांनी सिंधुताई सपकाळ, फू बाई फू, गुळाचा गणपती, पाठलाग, एक राधा एक मिरा, स्वर्गांधर्व सुधिर फडके, सुभेदार, चंद्रमुखी, फर्जद, शेर शिवराज, मनाचे श्लोक, द पावर, मन फकीरा, मस्का, फतेशिकस्त, मिस यू मिस्टर यांसारख्या चित्रपट व टि. व्हि. सिरियल मध्ये भुमिका साकारुन आपल्या अभिनयाची छाप रसिकांवर उमटवलेली आहे.

यावर्षी स्नेहसंमेलनात फॅशन शो, नृत्य स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, जेसीईटी झुम, डिबेट, अंताक्षरी, नाटयस्पर्धा, कबड्डी, क्रिकेट, खो-खो, फुटबॉल आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. वार्षीक स्नेहसंमेलन 'विंग्स २५' च्या बक्षिस वितरण सोहळयामध्ये क्रिडा स्पर्धाच्या विजेत्यांना पारितोषिके तसेच अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०२४ च्या परिक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मृन्मयी देशपांडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. महाविद्यालयामध्ये येत असलेल्या सुप्रसिद्ध सिने तारीकेमुळे विद्यार्थ्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे व जल्लोषाचे वातावरण आहे. उपस्थित राहणाऱ्या पाहुन्यांच्या स्वागताकरीता महाविद्यालयीन प्रशासनाने जयत तयारी केली असल्याची माहीती संस्थेचे सचिव डॉ. शितल वातीले यांनी दिली.

Post a Comment

0 Comments