यवतमाळ : गावात राहत असलेल्या
आई-वडीलांचा जेवनाचा डब्बा व डिझेलची कॅन घेवून जात असतांना तोल गेल्याने दुचाकी
दरीत कोसळली. या अपघातात दुचाकीस्वार इसम ठार झाला. ही घटना आज गुरुवारी सकाळी ९
वाजताच्या सुमारास पुसद तालुक्यातील बाळूमामा मंदिर जवळ निंबी येथे घडली.
मनोज बळीराम आडे वय ४५ वर्ष रा.
श्रीरामपूर पुसद असे मृतकाचे नाव आहे. ते हिवळणी या गावचे माजी सरपंच व श्रीकृष्ण क्रिकेट क्लब आयोजक होते. आज दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजातच्या सुमारास ते आपल्या गावी
आई-वडीलांसाठी जेवणाचा डब्बा घेवून दुचाकीने जात होते. यावेळी त्याने दुचाकीवर
समोर डिझेलची कॅनही नेली होती. बाळूमामा मंदिर जवळ निंबी जवळ डिझेलच्या कॅन घसरल्याने तोल गेल्याने दुचाकी दरीत कोसळली. त्यामुळे दुचाकीस्वार मनोज आडे दरीत दगडावर आदळल्याने डोक्याला जबर मार लागुन
जागीच ठार झाला. मनोज आडे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, 5 वर्षाचा मुलगा, 3 वर्षाची मुलगी असा आप्त परिवार आहे. यावेळी
घटनास्थळावर नागरिकांनी गर्दी केली होती.
0 Comments