बिंदूनामावलीत सर्व विभागांच्या तपासण्या बंद असल्याचा परिणाम
राहुल वासनिक / तहलका टाईम न्युज नेटवर्क
यवतमाळ
: शिक्षण विभागातील शासकीय व खासगी संस्थांमधील बिंदूनामावली अद्ययावत
नाही.
बिंदूनामावतील सर्व विभागांच्या तपासण्या बंद आहे. त्यामुळे यवतमाळसह
राज्यातील अन्य आठ जिल्ह्यातील मधील शिक्षक भरतीवर
संक्रांत आली आहे. विशेष म्हणजे आठही जिल्हे आदिवासी बहुल असून, शिक्षणाचा
खेळखंडोबा सुरु असल्याचे दिसून येते.
नविन जीआर काढला नाही
राज्यात एससीबीसी आरक्षण 27 फेब्रुवारी 2024 रोजी
लागू झाले आहे. यवतमाळ जिल्ह्यांसह राज्यात नवीन बिंदूनामावली
कार्यान्वित झाली. मात्र राज्यातील
यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, रायगड आदी आदिवासीबहुल
जिल्ह्यांसाठी अजून सामान्य प्रशासन विभागाने स्वतंत्र जीआर काढला नाही. नवीन आरक्षणानुसार
प्रत्येक जिल्ह्यातील आदिवासींचे आरक्षण वेगवेगळे लागू होते, तो जीआर न काढल्यामुळे सर्व विभागाच्या बिंदूनामावली तपासण्या बंद आहेत.
बिंदूनामावली तपासली गेली नाही तर पदे निघणार नाहीत; नोकर भरती होणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र शिक्षकांना रोजगार
मिळणार नाही. रोजगारासाठी त्यांना आठ जिल्हे सोडून इतर जिल्ह्यात जावे लागणार आहे.
यवतमाळ जिल्हा पदभरतीतून बाद
शिक्षण विभागातील शिक्षकांची रिक्त
पदे भरण्यासाठी खासगी व शासकीय शाळांमध्ये पवित्र पोर्टल कार्यान्वित झाले आहे. परंतु, जिल्ह्याची बिंदूनामावली अद्ययावत नाही. त्यामुळे यवतमाळ जिल्हा या
पदभरतीमधून बाद झालेला आहे. येथे कुठलीही शिक्षकांची पदे भरली जाणार नाहीत. स्थानिकांना
शिक्षकाची नोकरी मिळणार नाही.
0 Comments