‘फायनांस’च्या कर्मचा-याला लुटणा-या टोळीचा पर्दाफाश

सहा आरोपींना अटक : साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

यवतमाळ : चाकुच्या धाक दाखवुन फायनांस कंपनीच्या कर्मचा-याला लुटल्याची घटना लखमापूर ते कापरा मार्गावर घडली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्रे फिरवुन लुटमार करणा-या टोळीचा पर्दाफाश केला. पोलिसांनी सहा आरोपींना अटक करून त्याच्याकडून ४ लाख ५४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अजय लक्ष्मण पंधरे वय २५ वर्ष, सचिन मधुकर कोराम वय २१ वर्ष, संग्राम मारोती घोडाम वय १८ वर्ष रा. मेटीखेडा, ता. कळंब, दुर्गेश धोंडीराम डवरे वय २० वर्ष, अरविंद मारोती आगोसे वय २७ वर्ष रा. गाडीवन, ता. उमरखेड, साईप्रसाद मारोती कोटवाड वय २४ वर्ष रा. मंगरुळ, ता. हिमायतनगर, जि. नांदेड अशी आरोपींची नावे आहे. भारत फायनान्स कंपनी मध्ये काम करणारे संदेश संजय ढोकणे हे दिनांक १६ जानेवारी रोजी लखमापूर येथे बचत गटाची वसूली करण्यासाठी गेले होते. त्यानंतर पैसे वसुल करुन परत येत असतांना लखमापूर ते कापरा रोडवर अज्ञात आरोपींनी संदेश ढोकणे यांना अडवले. चाकुचा धाक दाखवून त्याचे जवळील पैशांची बॅग जबरीने हिसकावून नगदी २,७८,२१९/- रु चोरुन नेले होते. याप्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपीं विरुद्ध अप.क्र. २४/२०२५ कलम ३०९ (४) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सावरगड येथून आरोपी जेरबंद

भारत फायनांस कंपनीच्या कर्मचा-याला लुटणारे आरोपी दुचाकीने ४ फेबुरवारी रोजी सावरगड दर्गा येथे येत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी सापळा रचुन सहा आरोपींना अटक केली.

दुचाकीसह मुद्देमाल जप्त

पोलिसांनी आरोपींना अटक करून अंगझडत घेवून गुन्ह्यातील चोरुन नेलेली २,२८,०००/- रु रोख, २ मोटार सायकल  किंमत १,६०,०००/- रु, तसेच आरोपींचे ६ मोबाईल किंमत ६६,०००/- रु असा एकुण ४,५४,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील कारवाईसाठी आरोपींना पो. स्टे. यवतमाळ ग्रामीण यांचे ताब्यात देण्यात आले.

कारवाई करणारे पथक

सदर कारवाई पोलीस अधीक्ष कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी यवतमाळ दिनेश बैसाने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश चवरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमल्लु, सफौ बंडू डांगे, सफौ सै. साजिद, सफौ योगेश गटलेवार, पोहवा अजय डोळे, पोहवा रुपेश पाली, पोहवा योगेश डगवार, पोहवा प्रशांत हेडाऊ, पोहवा विनोद राठोड, पोहवा रितुराज मेडवे, पोशि आकाश सहारे, पोशि धनंजय श्रीरामे, पोशि देवेंद्र होले, पोशि आकाश सुर्यवंशी, पोहवा कविश पाळेकर, पोशि दिगांबर पिलावन, चापोहवा योगेश टेकाम यांनी केली.

 

Post a Comment

0 Comments