तीन आरोपींना अटक : वणी शहरातील घटना
दहा महिन्यापूर्वी मर्ग दाखल
दि. २५ मार्च
२०२४ रोजी फिर्यादी थॉमस माणिक कोमलवार वय ३५ वर्ष रा राजुर कॉलरी वार्ड नंबर ३ वणी यांचे जबान रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन वणी येथे मर्ग क्रमांक ३१/२०२४ कलम १७४
जफौ प्रमाणे नोंद करण्यात आला होता. सदर मर्ग मध्ये
प्रेत विहिरीत पडून मयत झाला अशा जबानी रिपोर्ट वरून अनोळखी इसमा बाबत मर्ग नोंद
होता.
संशय व्यक्त केल्याने भंडाफोड
सदर मृतकाची ओळख पटविण्याचे
आव्हान वणी पोलिसांसमोर उभे ठाकले होते. चौकशीत मृतक हा नामदेव पोचम
शनुरवार वय ५० वर्ष रा. राजुर
कॉलरी वणी हा असल्याचे समोर आले होते. सदर मर्ग चौकशीमध्ये नातेवाईकांचे
बयान नोंदविले असता संशय व्यक्त केला होता. त्यावरुन वणी पोलिसांनी चौकशी
केली असता मृतक नामदेव पोचम शनुरवार याचे आरोपी सिद्धार्थ मारुती शनुरवार
हिच्या आई सोबत अनैतिक सबंध असल्याची माहिती समोर आली.
प्लॅनिंग करुन केला खून
नातेवाईकांनी संशय व्यक्त केनल्याने
वणी पोलिसांनी दि. ११
फेब्रुवारी रोजी सिद्धार्थ मारुती शनुरवार दिवाकर शंकर गाडेकर, पिंटू वामन मेश्राम रा राजूर कॉलरी वणी याना ताब्यात घेवून विचारपूस केली. यातील आरोपी सिद्धार्थच्या आईसोबत मृतक
नामदेव पोचम शनुरवार याचे अनैतिक सबंध होते. त्यामुळे मृतकाला नातेवाईकांनी समजून सांगीतले होते. मात्र तो ऐकत नसल्याने
दिवाकर, पिंटू यांनी प्लॅनिंग करुण दारू पिण्याचे बहाण्याने
बाहेर नेले. मृतक नामदेव याला दारू पाजुन रेल्वे पटरी (राजूर
कॉलरी) जवळ आणुन लाथा, बुक्क्यांनी
मारहाण करुन विहिरीत फेकून दिल्याची कबुली दिली.
मृतकाच्या बहिणीने दिली तक्रार
मृतक नामदेव
शनुरवार याची बहिण शोभा शंकर अडकिलवार हिचे बयानावरून व जबानी रिपोर्ट
वरून सदर अप क्रमांक १२४/२०२५ कलम ३०२, २०१, ३४ भा द वी प्रमाणे दि. ११/०२/२०२५ रोजचे १७/५५
वाजताच दाखल करण्यात आला. तिन्ही आरोपींना
अटक करण्यात आली. पुढील तपास सपोनी निलेश अपसुंदे
पोलीस स्टेशन वणी करत आहे.
कारवाई करणारे पथक
सदरची कारवाई गणेश किंद्रे उपविभागीय
पोलीस अधिकारी वणी, गोपाल उंबरकर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वणी,
यांचे मार्गदर्शनात सपोनी निलेश अपसुंदे, ना पो का अविनाश बानकर, ना पो का अमोल अन्नेरवार, पो का शंकर चौधरी, पो का रितेश भोयर
(राजुर बीट ) यांनी केली.
0 Comments