यवतमाळात अकरावे विदर्भस्तरीय संत साहित्य संमेलन

संमेलनाध्यक्ष साहित्यिक प्रा डॉ रमाकांत कोलते

यवतमाळ : ‌भारतीय विचार मंच, विदर्भ प्रांत आणि संस्कृती संवर्धन मंडळ, यवतमाळच्या वतीने अकराव्या विदर्भस्तरीय संत साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे.  यावर्षी दिनांक 2 मार्च 2025 ला यवतमाळ येथील सहकार सांस्कृतिक भवन आर्णी रोड येथे  होणार आहे. संत मुंगसाजी महाराज साहित्य नगरी असे या परिसराला नाव देण्यात येणार आहे. सकाळी साडे आठ वाजता ग्रंथ दिंडी पासून सुरू होणार आहे. 

या संमेलनाच्या उद्घाटन सत्रात साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष यवतमाळ येथील ख्यातनाम साहित्यिक प्रा डॉ रमाकांत कोलते, गुरुकुंज मोझरी आश्रमाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष दि गोदावरी अर्बन मल्टीस्टेट सोसायटी नांदेडचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, पद्मश्री पुरस्कारासाठी घोषणा झालेले सुप्रसिद्ध नैसर्गिक शेती तज्ञ  सुभाष शर्मा, ज्येष्ठ विचारवंत रवींद्र उपाख्य राजाभाऊ मुळे, प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे, संत अध्याय समूहाचे राज्य संयोजक प्रा डॉ सुभाष लोहे, संस्कृती समर्थक मंडळाचे अध्यक्ष विजय कोषटवार तसेच भारतीय विचार मंचाचे प्रांत संयोजक डॉ सतपाल सोवळे यांची उपस्थिती राहणार आहे.

उद्घाटन सत्रात संगीता वायचाळ यांनी संपादित केलेल्या 'संतांची मांदियाळी' या शोध पत्रिकेचे विमोचन होईल तसेच यवतमाळ येथील सेवा समर्पण संस्था, यवतमाळचे अध्यक्ष  प्रशांत बनगिनवार व बेघर मनोरुग्णांसाठी काम करणारे नंददीप फाउंडेशन यवतमाळचे अध्यक्ष  संदीप शिंदे यांचा सेवाव्रती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने संतांच्या कार्यावर प्रकाश टाकणारी प्रदर्शनी लावण्यात येणार आहे. डॉ किशोरी केळापुरे व समिती त्याचे संकलन व संपादन करणार आहे. भरगच्च वैचारिक मेजवानी असणारे तीन परिसंवादाचे सत्र आहे.  पहिल्या सत्रात वैदर्भीय संतांचे जीवन व कार्य या विषयावरील परिसंवादाचे प्राचार्य डॉ शांताराम बुटे हे अध्यक्ष असतील. तर प्रा शलाका जोशी, प्राचार्य डॉ रमेश जलतारे. अरविंद राठोड यांचे उद्बोधन ऐकायला मिळणार आहे. यवतमाळ येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ प  चैतन्य सहस्त्रबुद्धे यांचे किर्तनाचा कार्यक्रम असेल. तिसऱ्या सत्रामध्ये महाराष्ट्रातील मध्ययुगीन संतांचे कार्य या विषयावरील परिसंवादात एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्षा माणिक कद्रे या सत्राचे अध्यक्ष असतील. तर सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा राजेंद्र नाईकवाडे, प्रा डॉ ज्ञानेश्वर गटकर, सुप्रसिद्ध विचारवंत श्रीमती अरुंधती ताई कावडकर यांचे उद्बोधन ऐकायला मिळणार आहे. समारोपीय सत्रात संत साहित्याचा विपर्यास आणि वास्तव या विषयावरील सत्रा मध्ये प्रा श्यामसुंदर उपाध्य श्यामबावा निचीत रविंद्र मुळे, श्री श्रीधरराव गाडगे विचार मांडतील आणि डॉ सुभाष लोहे समारोप करणार आहेत. सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन व प्रार्थना चे महत्व याविषयावर डॉ सूर्यप्रकाश जयस्वाल यांच्या मनोगतनंतर कार्यक्रमाची सांगता होईल साहित्य संमेलनाचे संयोजक प्रा डॉ ताराचंद कंठाळे, सहसंयोजक  मिलिंद देशकर, समन्वयक  गजानन वायचाळ यांचेराह डॉ ललिता घोडे, सचिन जोशी,  अतुल गंजीवाले. डॉ महेश सारोळकर, परीमल देशपांडे, प्रा डॉ अनंत सूर्यकार, योगेश चव्हाण, ललित काले आणि स्वागत समिती, संयोजन समिती व आयोजन समितीचे पदाधिकारी सक्रिय सहभाग घेत आहे.

Post a Comment

0 Comments