‘फिटनेस’ नसलेल्या स्कुलबसमधून विद्यार्थ्यांचा ‘प्रवास’

पालकांच्या पाहणीत वासत्व उघड : सोशल मिडीयावर व्हायरल

यवतमाळ : जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडून विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ सुरु असल्याचा प्रकार पहावयास मिळत आहे. यापुर्वी एका घटनेत उमरखेड तालुक्यातील दहागाव येथील स्कुलबसचा अपघात होवून एका विद्यार्थीनीचा बळी गेला. तर दुस-या घटनेत पुसद येथे विद्यार्थी घेवून जाणा-या दोन ऑटोंचा अपघात होवून एक विद्यार्थी ठार झाला आहे. त्यानंतरही ‘फिटनेस’ नसलेल्या स्कुलबसमधून विद्यार्थ्यांचा अ‘सुरक्षित’ प्रवास सुरु असल्याचे वास्तव आज समोर आले आहे.

उमरखेड तालुक्यातील दहागाव येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडून परिसरातील गावातील विद्यार्थ्यांना स्कुल बसमधून ने-आण करण्यात येते. नेहमी प्रमाणे आज दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास एम. एच. ४० बी जी. १९०९ क्रमांकाच्या स्कुल बसमध्ये तरोडा, कळमुला, वसंतनगर, येथील विद्यार्थी घेतले. त्यानंतर सदर बस पोफाळी येथे पोहचली. यावेळी पालकांनी या स्कुलबसची पाहणी केली.

रिमोट टायर अन् मोडकडीस असलेल्या सिट

या स्कुल बसमध्ये मागील बाजूस ३ टायर, ४ ट्यूब बंडल, मोडकी आलेल्या सीट, डाव्या साईडचा साईट ग्लास लनाही. एवढेच नाही तर टायर रिमोट असलेली गाडी असल्याचे वास्तव समोर आले आहे. तसेच स्कुलबसच्या वाहक व चालकाकडे बसचे कागदपत्रही उपलब्ध नाही. त्यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असा आरोपही पालकांनी केला आहे.

फिटनेस प्रमाणपत्र आवश्‍यक

इंग्रजी माध्यमाकडे असलेल्या स्कुबसचे फिटनेस प्रमाणपत्र परिवहन विभागाकडून घेणे गरजेचे असते. स्कुलबसची तपासणी करून परिवहन विभागाने सदर बसला फिटनेस प्रमाणपत्र दिले आहे का असा सवालही उपस्थित होत आहे.


Post a Comment

0 Comments