सॉफ्टबॉल स्पर्धेतील खेळाडूंचा गौरव

यवतमाळ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्धी वर्षानिमित्ताने १ जून २०२४ ते ३१ मे २०२५ हे वर्ष त्रीशताब्धी वर्ष म्हणून साजऱ्या केल्या जात आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती, म.फुले चौक,आझाद मैदान समोर यवतमाळ तर्फे साप्ताहिक पूजन केल्या जात आहे. त्यानिमित्ताने रविवार दि.२३ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तैलचित्राचे अडतीसावे पुजन नितीन माने, यश माने व उषाताई माने यांचे हस्ते पार पडले. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समितीतर्फे  सॉफ्टबॉल स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त खेळाडूंचा गौरव करण्यात आला. संत गाडगेबाबा यांच्या जयंती निमित्ताने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी घनश्याम दरणे, प्रफुल देशमुख, राजेंद्र बाहेकर, उमेश मेश्राम, पवन थोटे, सुरेश भावेकर, अमोल शिंदे,सुनील सोडगीर आदी समाज बांधव मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.

या खेळाडूंचा झाला सत्कार

इंटर युनिव्हर्सिटी सॉफ्टबॉल इंटरनॅशनल चॅम्पियनशिप मृणाल फुसाटे अंडर १९ सॉफ्टबॉल नॅशनल गोल्ड मेडल प्राप्त खेळाडू रत्नशील डोंगरे, सम्यक गजभिये, रोहनशू खंडारे, अंडर १७ सॉफ्टबॉल नॅशनल गोल्ड मेडल मिळालेले खेळाडू सुबोध अंबागडे,अनुश्री राठी अंडर १९ बेसबॉल नॅशनल गोल्ड मेडल मिळालेले खेळाडू दक्ष रामटेके व अंडर १९ स्टेट लेवल गोल्ड मेडल मिळालेले खेळाडू रत्नशील डोंगरे,सम्यक गजभिये, रोहनशू खंडारे, दक्ष रामटेके, हेमराज लभने, अथर्व पाटिल, प्रथमेश दिघाडे, रितेश जांभुळकर, अर्जुन दिघाडे, देवा राऊत, अंडर २३ मेन्स एशियन सॉफ्टबॉल चॅम्पियन मध्ये रोहित मेश्राम या खेळाडूंचा गौरव करण्यात आला.  तसेच प्रशिक्षक भाकीत मेश्राम यांचा गौरव करण्यात आला. 

Post a Comment

0 Comments