फळ व भाजी विक्रेत्यांचा एल्गार : बुधवारपासून पालिकेसमोर आंदोलन

यवतमाळ : नगर पालिका प्रशासनाने शहरातील जाजू चौक ते शनिमंदिर रोड व जाजू चौक ते तहसील कार्यालय रोडवरील भाजी व फळ विक्रेत्यांची दुकाने हटविली आहे. सदर विक्रेत्यांना आठवडी बाजारात पर्यायी जागा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र त्या ठिकाणी व्यवसाय होत नसून मालाचे पैसे निघत नाही. त्यामुळे विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. जाजु चौकातच जागा देण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र नगर परिषद प्रशासनाने लखल घेतली नाही. 

त्यामुळे विर भगतसिंग फळ व भाजी विक्रेता संघाच्या वतीने बुधवार दिनांक ५ फेब्रुवारी पासून यवतमाळ नगर पालिकेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या बाबतचे निवेदनही शहर पोलीस ठाणे, अवधूतवाडी पोलीस स्टेशन व नगर परिषद प्रशासनाला दिले आहे. निवेदन देते वेळी विर भगतसिंग फळ व भाजी विक्रेता संघाचे अध्यक्ष सूरज खोब्रागडे, उपाध्यक्ष त्रिशुल माकोडे, सचिव खालीद शेख यांच्यासह फळ व भाजी विक्रेते उपस्थित होते.

 

Post a Comment

0 Comments