बंदुकीच्या धाकावर धाबा चालकाला लुटले ; तीन संशयीत ताब्यात


यवतमाळ : तीन दरोडेखोरांनी बंदूक व धारदार शस्त्राचा धाक दाखवून धाबा मालकाडून रोख रक्कम लुटली. ही घटना दि. 27 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 2.30 वाजता हैदराबाद नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पांढरकवडा तालुक्यातील कोंघारा गावाजवळ धाब्यावर घडली. या प्रकरणी  पांढरकवडा पोलिसांनी मध्यरात्री उशिरा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सिसीटीव्हीच्या आधारे तपास करीत तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

करण संजय शिंदे वय ३० वर्ष रा ताडउमरी,  सुजित मोक्षवीर वानखेडे वय २४ वर्ष लटारे ले आऊट पांढरकवडा, समीर शेख चांद वय २२ वर्ष रा आखाडा वार्ड पांढरकवडा असे संशयीत आरोपीचे नाव आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील कोंघारा गावा जवळ असलेल्या रामदेव ढाबा आहे. तीन आरोपी हे आपल्या मोटरसायकल क्र. एम एच ३४ वी ७४५५ ने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील कोंघांरा गावाजवळील धाब्यावर जेवन करण्याकरिता गेले. 27 फेब्रुवारी रोजी नेहमी प्रमाणे रात्री १२ वाजता बंद झाला होता. काल मध्यरात्री २.३० वाजता दरम्यान तिन आरोपी दुचाकीने धाब्यावर आले. त्यांनी धाब्यावरील अंकित नरपतराव कुलेरीया (१८) रा. राजस्थान ह. मु. रामदेव धाबा यांच्याकडे जेवण देण्याची मागणी केली. अंकितने धाबा बंद झाला आहे. जेवण नाही असे सांगताच त्यातील एकाने अंकितवर बंदुक तानली. तर दुसऱ्याने चाकु दाखविला. तिसऱ्या आरोपीने अंकितच्या धाब्यातील गल्ल्यात ठेवुन असलेले १५ हजार २०० रुपये काढून तेथून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पांढरकवडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशिर, पोहेका प्रमोद जुनुनकर, सचिन काकडे, पोलिस शिपाई, राजु बेलेवार, राजु मुत्यालवार, गौरव नागलकर, राजु सुरोशे यांनी कारवाई केली.

डायल ११२ वर दिली माहिती

आरोपींनी अंकितला आरडा, ओरड केल्यास जिवे मारण्याची धमकी देत, पैसे घेवुन ते तिघेही दुचाकीने करंजी रोड गावाच्या दिशेने पळुन गेले. अंकितने तात्काळ ११२ वर कॉल करुन घटनेची माहिती पोलीसांना दिली. काही वेळातच पोलीस धाब्यावर पोहचले. त्यांनी धाब्यावरील सिसिटिव्ही कॅमेरे तपासले. पोलीस आरोपीच्या मागावर निघाले होते. पोलीसांनी काही तासातच तिन संशयीतांना ताब्यात घेवुन चौकशी सुरु केली आहे.

Post a Comment

0 Comments