मारेकरी मुलगा जेरबंद : मेंढला येथील घटना
राहुल वासनिक / तहलका टाईम ऑनलाईन
यवतमाळ :
शेतीच्या वादातून मुलाने चाकुने गळा कापून वडीलाची हत्या केली. ही घटना यवतमाळ
ग्रामिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या मेंढला या गावात १९ फेब्रुवारी रोजी
रात्री १ ते १.३० वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी २४ तासाच्या आत मारेक-याला
जेरबंद केले. या घटनेने मेंढला गावात खळबळ उडाली आहे.
सुभाष झोलबाजी
चौधरी वय अंदाजे ५२ रा. मेंढला ता.
कळंब असे मृतकाचे नाव आहे. तर प्रफुल्ल सुभाष चौधरी वय २४ वर्ष रा. मेंढला असे आरोपीचे नाव आहे. मृतक
सुभाष चौधरी यानी आरोपी प्रफुल्ल चौधरी याच्या नावावर अडीच एकर शेती करुन दिली
होती. मात्र तो शेती करीत नसल्याने सदर शेती माझ्या नावावर करुन दे असा तगादा
वडीलाने लावला होता. त्यावरुन मृतक वडील सुभाष व आरोपी मुलगा प्रफुल्ल या दोघात
वाद झाले होते. दरम्यान १९ फेब्रुवारी रोजी घरात सर्व जण झोपून होते. अशातच रात्री
१.१.३० वाजताच्या सुमारास आरोपी प्रफुल्ल याने चाकुने वडीलाच्या गळावर वार केले. यावेळी
त्यानी आरडा ओरड केल्याने दुसरा मुलगा व मुलगी जागे झाले. त्यामुळे आरोपीने तेथून
पळ काढला. या घटनेत गळ्यावर चाकूने वार केल्यामुळे
सुभाष चौधरी यांचा जागीच मृयू झाला. शेत
जमीन नावावर कर या कारणा वरून आरोपी याने आपले वडील सुभाष यांना ठार केले. या
घटनेची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामिण पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करुन
मृतदेह शवविच्छेदनासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
ग्रामिण पोलीस ठाण्यात गुन्हा
मृतकचा लहान
मुलगा प्रवीण सुभाष चौधरी वय २१ रा. मेंढला यानी यवतमाळ ग्रामिण पोलीस ठाणे गाठुन
तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी आरोपी प्रफुल्ल सुभाष चौधरी वय २४
वर्ष याच्या विरुद्ध
अप. क्रमांक. 57/2025 कलम 103 (1)
बी. एन. एस. अंतर्गत गुन्हा दाखल केला.
जंगलातून केली अटक
चाकुने वार करीत
वडीलाचा खून करून आरोपी प्रफुल्ल हा घटनास्थळावरुन पसार झाला होता. पोलिसांनी
गुन्हा दाखल करुन आरोपीची शोध मोहिम राबविली. दरम्यान आज गुरुवारी सकाळी बोरगाव
मादणी जंगलात त्याला अटक करण्यात आली.
कारवाई करणारे पथक
सदर कारवाई जिल्हा
पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक पियूष जगताप, उपविभागीय
पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ
ग्रामिण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रशांत कावरे, पोलीस उपनिरीक्षक वसंत शिंदे, पोलीस
उपनिरीक्षक गजानन शेजुलकर, हे. कॉ. कैलास लोथे, पो. कॉ. रुपेश नेवारे,
संदीप मेहत्रे, अरविंद वाघाडे यांनी
केली.
0 Comments