आक्षेपार्ह मजकुर टाकणारा व्यक्ती निघाला दुसराच, पुसद येथील घटनेचा उलगडा
गोरक्षनाथ लक्ष्मण शिंदे. वय १९
वर्षे, रा. मधुसुदन
नगर काकडदाती पुसद असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. दिनांक १३
फेब्रुवारी रोजी पुसद शहरात छत्रपती शिवाजी महाराज व संत सेवालाल महाराज
यांच बद्दल सोशल मिडीयावर आक्षेपार्ह मजकुर टाकुन धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी
पोलीस स्टेशन पुसद (शहर) येथे अप.क्र. ६३/२०२५, कलम-२९९ BNS प्रमाणे गुन्हा
दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणात एका अल्पवयीन विद्यार्थ्याचे नाव वापरुन ईन्स्टाग्राम
वरुन आक्षेपार्ह कॉमेन्ट टाकल्या प्रकरणी प्रार्थामक तपासामध्ये त्याचेवर गुन्हा दाखल
करण्यात आला होता. परंतु गुन्हयाचा सखोल तपास सुरु असतांना तपासामध्ये सदरची कॉमेन्ट
करणारा ईसम हा दुसराच असल्याचे समोर आले आहे.
बदला घेण्याच्या हेतूने बनवला फेक आयडी
गोरक्षनाथ लक्ष्मण शिंदे याचे
व अल्पवयीन मुलाचे पुर्वीचे असलेल्या वादातुन त्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने त्याचे
मोबाईलवर अल्पवयीन मुलाचे फेक ईन्स्टाग्राम अकाऊंट तयार केले. सदर
अकाउंडवरून त्यावरुन छत्रपती शिवाजी महाराज व संत सेवालाल महाराज यांचे
बद्दल सोशल मिडीयावर आक्षेपार्ह मजकुर टाकल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
सदर आरोपी गोरक्षनाथ शिंदे यास ताब्यात घेतले आहे.
कारवाई करणारे पथक
पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, सहायक पोलीस अधीक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी, पुसद हर्षवर्धन बि.जे. यांचे
मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा तांत्रीक व गोपनीय बातमीदाराच्या माध्यमातुन उघडकीस
आनण्याकरीता पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर, एपिआय धिरज बांडे,
एपिआय
निलेश देशमुख, पो. हे. कॉ. मनोज कदम, पो. हे. कॉ. निलेश उंचेकर,
पो. ना. दिनेश सोळंके,
पो. कॉ. आकाश बाभुळकर,
पो. कॉ. शुध्दोधन भगत, पो. स्टे. पुसद (शहर)
यांनी अथक परीश्रम घेतले. असुन गुन्हयाचा अधिक तपास सुरु आहे.
अफवावर विशवास ठेवून नका
सोशल मिडीयाचा जपुन व काळजीपुर्वक
वापर करावा नविन तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन अशाप्रकारे स्वतःचे किंवा दुसऱ्याच्या
नावाने सोशल मिडीयावर फेक अकाऊंट तयार करुन आक्षेपार्ह मजकुर किंवा पोस्ट टाकल्यास
अशा ईसमांवर सायबर पोलीस विभाग लक्ष ठेवुन आहे. नागरिकांनी सुध्दा याबाबत सतर्कता
बाळगुन असा प्रकार निदर्शनास आल्यास त्याबाबत पोलीस विभागाशी संपर्क साधावा परस्पर
कोणत्याही अफवावर विश्वास ठेवुन कायदा हातात घेवु नये. अशा सोशल मिडीयावर गैरवापर करणाऱ्यांवर
कडक कायदेशोर कारवाई करण्यात येईल असे सहायक पोलीस अधीक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी, पुसद हर्षवर्धन बि. जे.,
ठाणेदार उमेश बेसरकर यांनी जनतेला आवाहन केले आहे.
0 Comments