मराठी चित्रपटात मिळणार गाण्याची संधी : चित्रपट दिग्दर्शक सुभाष गायकवाड यांची घोषणा
यवतमाळ : गेल्या २० वर्षापासून यवतमाळ येथे समता पर्वाचे आयोजन
करण्यात येते. या कार्यक्रमात यवतमाळ आयडॉल हा
कार्यक्रम घेण्यात येते. यावर्षी इंडियन आयडॉल फेम सवाई भट्ट यांना निमंत्रण दिले
आहे. सवाई भट्ट हे यावर्षीचे आकर्षण राहणार आहे. प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या
यवतमाळ आयडॉलला मराठी चित्रपटत गाणे गाण्याची संधी देण्यात येणार आहे. या
बाबतची अधिकृत घोषणा पुणे येथील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुभाष गायकवाड
यांनी केली आहे. यावर्षी मंगळवार दि ८ एप्रिल २०२५ रोजी इंडियन
आयडॉल फेम सवाई भट्ट यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची
माहिती आयोजकांनी दिली आहे.
समतापर्वाचे
खास आकर्षण असलेला यवतमाळ आयडॉल हा गीत स्पर्धेचा लोकप्रिय कार्यक्रम यावर्षी लोककवी,गीतभीमायण कार राजानंद गडपायले आणि शांताई गडपायले यांच्या स्मृतीस
अर्पण करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आयोजन समितीने घेतला आहे.
यवतमाळ
येथील पाटीपुऱ्यात जन्मलेले राजानंद गडपायले हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कालखंडातील
कवी आणि गायक होते. त्यांच्या गीत संग्रहास खुद्द डॉ. बाबासाहेबांच्या सहिनीशी प्रतिक्रिया
आहे. यावर्षी शांताई गडपायले यांचे निधन झाल्यामुळे आयोजन समितीने हा निर्णय घेतला असून, त्यांच्या नावे प्रोत्साहनपर बक्षीसं देखील समितीने जाहीर केले आहे.
यवतमाळ आयडॉलमध्ये दिग्गजांची हजेरी
आजपर्यंत
अभिजीत सावंत, अभिजीत कोसंबी, वैशाली माडे,
साधना सरगम, अनुराधा पौडवाल, विठ्ठल उमप, मिलिंद शिंदे, आनंद
शिंदे, आशिष कुलकर्णी, ऋतिका बोरकर, कृतिका बोरकर, सिस्टर जाधव, सिस्टर
शाहीर, संभाजी भगत आदि संगीत क्षेत्रातील
दिग्गजानी यवतमाळ आयडॉल मध्ये हजेरी लावली आहे.
0 Comments