खोट्या कागदपत्राद्वारे शेतीची खरेदी : दोन आरोपींना अटक

 एसडीपीओंच्या पथकाची कारवाई



यवतमाळ : शेतीचे खोटे कागदपत्र करून शेतीची खरेदी केल्याचा प्रकार उजेडात आला होता. या प्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात सह दुय्यम निंधकासह पाच जणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिका-यांच्या पथकाने या गुन्ह्यातीन दोन आरोपींना अटक केली. सदर आरोपींना न्यायलात हजर केले  असता २६ फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

करन निरंजन धवणे वय 25 वर्ष रा. चमेडिया नगर यवतमाळ, नितेश जगदेव चक्रे वय 35 वर्ष रा. बेंडकीपुरा यवतमाळ अशी आरोपींची नावे आहे. अनुप जयस्वाल यांना नुकसान पोहचविण्याच्या उद्देशाने आरोपीतांनी संगणमत करुन कट रचुन शेतीचे खोटे कागदपत्रे तयार केले. जयस्वाल यांचे नावाने खरेदी लिहुन देणार असे म्हणुन त्रयस्त व्यक्तीला खरेदी विक्रि कार्यालात उभे केले. सचिन शामराव राउत वय ३६ रा. मंगेश नगर भोसा रोड यवतमाळ याचे नावाने खरेदी खत नोंदवुन घेतले. किरण निरंजन धरण वय २४ रा. चमेडीया नगर यवतमाळ, नितेश जगदेव चकरे ३४ रा. चमेडीया नगर यवतमाळ यानी साक्षीदार म्हणून सह्या केल्या आहे. फिर्यादी प्रितेश उर्फ लकी दिनेश जयस्वाल, अनुप जयस्वाल याची फसवणूक केली. याप्रकरणी फिर्यादी प्रितेश उर्फ लकी जयस्वाल यानी शहर पोलीस ठाणे गाठुन तक्रार दिली. त्यावरुन दि. 10 फेब्रुवारी रोजी पो. स्टे. यवतमाळ शहर येथे अप. क्र. 233/25 कलम 318 (4), 336 (2), (3), 340 (2), 3 (5) BNS अंतर्गत आरोपी सचिन राऊत, नितेश चक्रे, करन धवणे, दुय्यम निबंधक अधिकारी यवतमाळ व त्यांचे साथीदावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एसडीपीओ दिनेश बैसाणे यांचे मार्गदर्शनात पोहवा अन्सार बेग, गजानन कोरडे, विकास कमनर, मिलिंद दरेकर यांनी केली.

दोन आरोपींना अटक

खोटे कागदपत्रे तयार करून शेताची बोगस खरेदी केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. दरम्यान २३ फेब्रुवारी रोजी आरोपी करन निरंजन धवणे वय 25 वर्ष रा. चमेडिया नगर यवतमाळ याला मारेगाव तालुक्यातील सासरवाडी येथून अटक केली. तर नितेश जगदेव चक्रे वय 35 वर्ष रा. बेंडकीपुरा यवतमाळ यास बेंडकीपुरा येथून ताब्यात घेतले आहे. सदर आरोपी हे सदर शेत विक्री चे खरेदी करीता साक्षीदार आहे. सदर आरोपींना न्यायालयात हजर करुन २६ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळविली.

 

Post a Comment

0 Comments