मराठीचा पेपर व्हायरल करणारा मुख्य आरोपी ताब्यात

यवतमाळ : जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील कोठारी येथील परीक्षा केंद्रावर दहावीची परीक्षा सुरु होती. यावेळी मराठीचा पेपर सोशल माध्यमावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी महागाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान आज शनिवारी महागाव पोलिसांनी मुख्य आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

अमोल बळीराम राठोड वय 28 वर्ष रा. कोठारी ता. महागाव असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याची पुतणी दहाव्या वार्गात शिकत असून, कोठारी येथील आदर्श विद्यालय केंद्र आहे. दि 21 फेब्रुवारी रोजी मराठी विषयाचा पेपर सुरु होता. अशातच तो नजर चुकवून केंद्र संचालक यांच्या ऑफिसमध्ये पाणी पिण्याकरिता घुसला. त्या ठिकाणी त्याला ऑफिसचे बाजूला असलेल्या पार्टिशन रूममध्ये मराठी विषयाची प्रश्नपत्रिका पडलेली मिळून आली. त्याने प्रश्नपत्रिकाचे स्वतःच्या मोबाईल मध्ये कॉपी पुरवण्याच्या उद्देशाने फोटो घेतले. त्या नंतर एका मित्राच्या मोबाईलवर पाठविले. तसेच त्याच्या मित्राने इतर मोबाईलवर प्रश्नपत्रिका व्हायरल केल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनराज निळे मार्गदर्शनात सुरू आहे.


Post a Comment

0 Comments