उर्सला ९६ वर्षाची परंपरा : आर्णी येथे बाबा कम्बलपोष उर्स महोत्सव

 बाबा कम्बलपोष र. अ. दरगाह ट्रस्टच्या वतीने जय्यत तयारी

यवतमाळ : आर्णी सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान असलेले हजरत सैय्यद अलहाज अब्दुल रहेमान साहाब उर्फ हजरत बाबा कम्बलपोष र. अ तथा हजरत सैय्यादी बच्चु बाबा र. अ. यांच्या स्मरणार्थ ५ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी पर्यत उर्स महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बाबा कम्बलपोष र. अ. दरगाह ट्रस्टच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात ओ आहे. यावर्षी बाबा कम्बलपोष उर्स महोत्सवाला ९६ वर्षे पुर्ण होत आहे.

बाबा कम्बलपोष उर्स महोत्सवा दरम्यान ५ फेब्रुवारी ला सायंकाळी पाच वाजता बाबाचा शाही संदल निघेल.६फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता गुजरात येथील सिराज चिश्ती यांचा कव्वालीचा कार्यक्रम, ७ फेब्रुवारीला सकाळी कुराणखानी, हाजी मौ हसन मिसाबाही साहेब यांची १० वाजता तकरीर त्यानंतर लंगर वाटप होणार आहे. पाच वाजता मुंबई येथील सलीम जावेद यांचा कव्वालीचा कार्यक्रम. ८फेब्रुवारीला खंजेरी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी ७५००० रूपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. ८ फेब्रुवारी ला नाशिक येथील समाज प्रबोधन, व्यसनमुक्ती विनोदी किर्तनकार ह. भ. प. ऋषिकेश महाराज कुयटे यांचा कार्यक्रम, १० फेब्रुवारी ला सायंकाळी चार वाजता मुंबई येथील मुराद अतीश व यु. पी. येथील ताहीर चिश्ती यांचा कव्वाली चा कार्यक्रम आहे. तसेच ५फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी पर्यत नि:शुल्क रोग निदान शिबीर तसेच नि:शुल्क नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे.तसेच दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत अन्नदानाचा कार्यक्रम आहे. सर्व भाविकभक्तांनी उर्स महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन बाबा कम्बलपोष र. अ. दरगाह ट्रस्टचे सचिव रियाज बेग यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments