'टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंट'चा पाठिंबा
अमरावती : विद्यार्थी व तासिका तत्त्वावरील शिक्षक यांच्या मागण्यांसाठी नेट-सेट पीएचडी संघटनेतर्फे ५ फेब्रुवारी रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठावर धरणे आंदोलन करणार आहे. विद्यार्थी व तासिका तत्त्वावरील शिक्षक यांच्या मागण्यांसाठी या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. ५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ ते ५ या वेळात हे आंदोलन होणार आहे. यामध्ये तासिका शिक्षक आणि नेट-सेट, पीएचडी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते विद्यापीठावर धडक देणार आहे. सदर आंदोलनास टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंट चा जाहीर पाठिंबा घोषित करण्यात आला आहे. कंत्राटी ऐवजी प्राध्यापकांची कायमस्वरुपी भरती करा, सन २०२५ चे यूजीसी ड्राफ्ट रेग्युलेशन रद्द करा, पदवी अभ्यासक्रमाला लागू केलेली सेमिस्टर पद्धत बंद करा. वार्षिक अध्ययन व परीक्षा पद्धती पूर्ववत करा आदी मागण्या आंदोलनातून रेटल्या जाणार आहे. विद्यार्थी, कंत्राटी शिक्षक आणि पालकांच्या भवितव्याशी निगडित प्रश्न असल्यामुळे टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंट च्या वतीने डॉ. प्रशांत विघे, डॉ प्रवीण बनसोड, अरविंद सुरोशे, गाजी जाहारोश, प्रफुल्ल कुकडे, विवेक वाडेकर, किशोर पवार, दीपक वाघ, मंगेश भुताडे, अफसर शेख, प्रतीक्षा ढोके, धीरज बनकर यांनी आंदोलनात उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.
0 Comments