‘त्या’ ग्रामसेवकावर निलंबनाची टांगती तलवार


यवतमाळ : मद्यधुंद अवस्थेत मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या दालनात झिंगणाऱ्या ग्रामसेवकाविरुद्ध अवधूतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. आता त्याच्या वैद्यकिय अहवालाची जिल्हा परिषद प्रशासनाला प्रतीक्षा असून, ग्रामसेवकावर निलंबनाच्या कारवाईची टांगती तलवार आहे.

उमरखेड तालुक्यातील जनुना येथे कार्यरत ग्रामसेवक मंगळवारी दुपारी ग्रामपंचायत सदस्यांना घेऊन सर्वात आधी सामान्य प्रशासन विभागात आला होता. नशेत झिंगत असल्याने तेथेच त्याला समज दिली. त्यानंतरही ग्रामसेवक आपला तोरा मिरवत सीईओंच्या दालनात पोहचला.

सीईओंनी दिले पोलिसांच्या ताब्यात

सीईओंनी ग्रामसेवक मद्यप्राशन करून असल्याने लक्ष्यात येताच कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. लगेच ही माहिती अवधूतवाडी पोलिसांना देण्यात आली. ग्रामसेवकाला ताब्यात घेत वैद्यकिय तपासणीसाठी शासकिय रुग्णालयात नेण्यात आले. त्यात मद्यप्राशन केल्याचे आढळून आले. याप्रकरणी महेंद्र हाटे यांनी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला. मद्य प्राशन करणाऱ्यांवर यापूर्वदिखील सीईओंच्या आदेशाने निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पोलिसांकडून अहवाल प्राप्त होताच निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या सूत्रांनी दिली.

Post a Comment

0 Comments