सहा गावात भूकंपाचे धक्के

यवतमाळ : जिल्ह्यातील मारेगाव शहरासह अन्य पाच गावात भूकंपाचे धक्के बसले आहे. हा प्रकार शुक्रवारी रात्री १० ते १०.३० वाजताच्या सुमारास घडला आहे. यामुळे सदर गावातील नागरिक भयभित झाले आहे. मारेगाव येथील तहसीलदारांनी भूकंपाचे धक्के बसलेल्या गावात भेट देवून नागरिकांसोबत संवाद साधला आहे. 

या गावात बसले भूकंपाचे धक्के

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव शहरातील निर्मितीनगरात शुक्रवारी रात्री १०.१० वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. त्यापाठोपाठ मारेगाव तालुक्यातील पिसगाव, कुंभा, चिंचाळा, पहापळ, सिंदी या गावातही भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहे. गावकरी झोपून असतांना अचानक रात्रीच्यावेळी भूकंपाचा धक्का बसला. यावेळी घरातील टिनाचा आवाज झाला. अनेकांच्या घरातील भांडे पडल्याचा आवाज झाला. या प्रकाराने नागरिक भयभित झाले.

तहसीलदारांनी साधला गावक-यांशी संवाद

पिसगाव येथील नागरिकांसह कुंभा येथील तलाठी सुरावार यांनी तहसीलदार यांना या प्रकाराची माहिती दिली. तहसीलदार उत्तम निलावाड यांनी तात्काळ पिसगांव, कुंभा या गावात भेट दिली. त्यानंतर त्या गावातील नागरिकासोबत संवाद साधला.

वरिष्ठांना माहिती कळविली

पिसगांव, कुंभा गावात भेट देऊन सरपंच नागरीकांशी चर्चा केली. यावेळी रात्री 10-10 वाजता भुकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. मात्र कोणतेही नुकसान झाले नाही. या संदर्भात वरिष्ठ कार्यालयास कळविण्यात आले आहे अशी माहिती मारेगावचे तहसीलदार उत्तम नीलावाड यांनी दिली.

 

Post a Comment

0 Comments