यवतमाळ : दिग्रस
तालुक्यातील साखरा येथील रहिवासी बी डी राठोड नाईक यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषदच्या माजी
महिला व बालकल्याण सभापती सुमन बळीराम नाईक यांचे दि. 26 फेब्रुवारी रोजी रात्री नागपूर येथे उपचारा दरम्यान निधन झाले. त्यामुळे
साखरा गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते. त्यांचा अंत्यविधी
मूळ गावी साखरा येथील स्मशानभूमीत आज बुधवारी दुपारी 2 वाजता करण्यात आला.
सेवानिवृत्त
दारूबंदी अधिकारी बी डी राठोड यांची पत्नी सुमनताई राठोड यांनी दिग्रस तालुक्यात नव्हे तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात सामाजिक राजकीय
क्षेत्रात प्रदीर्घकाळ कार्य करुन त्यांनी वेगळा ठसा उमटवला होता. मोख आरंभी जिल्हा परिषद सर्कलमध्ये पाच पंचवार्षिक विजय मिळवून अपराजित
नेतृत्व म्हणून त्यांची ओळख झाली होती. स्वर्गीय सुमनताई राठोड नाईक ह्या माजी मुख्यमंत्री
वसंतराव नाईक यांच्या भाची होत्या. तर नारायण नाईक मोख यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या.
माजी आमदार ॲड. निलय नाईक यांच्या सासु होत्या. साखरा गावातील गोरगरीब सर्वसामान्य
जनतेची मातृछायांचे छत्र हरविल्याने संपूर्ण
गावात शोकाकुल वातावरण पसरले आहे. आज दि. 26 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता साखरा येथील स्मशानभूमीत
हजारो चाहत्यांच्या
उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले व दोन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे.
0 Comments