काँग्रेसचे आ. विजय वडेट्टीवार यांचा निषेध


यवतमाळ : जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या बद्दल अपमानास्पद विधान केल्याप्रकरणी ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांचा जाहिर निषेध करण्यात आला. स्वस्वरूप संप्रदाय तालुका उमरखेडच्या वतीने जाहीर निषेध करुन सांप्रदायातील भक्तगणांनी निदर्शन केले.

एसडीओ कार्यालयावर धडक

उमरखेड तालुका संप्रदायातील जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या असंख्य शिष्य, साधक व भक्तगणांनी माहेश्वरी चौकात निदर्शने करून निषेध नोंदविला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. आ. विजय वडेट्टीवर यांनी केलेल्या अपनास्पद विधानाबद्दल जाहीर माफी मागावी या आशयाचे निवेदन उपविभागीय अधिका-यांना दिले.

निवेदन देतांना भक्तगण

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज भक्त मंडळ उमरखेड जिल्हा यवतमाळ (पश्चिम) चे निरीक्षक, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष तसेच असंख्य शिष्य, साधक व भक्तगणमंडळी उपस्थित होती. यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी बांधवांनी केलेल्या सहकार्याबद्दल संप्रदायाच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.

Post a Comment

0 Comments