अर्जट पेट्रोल पाहिजे असल्याचा केला बहाणा : चाकुच्या धाकावर पेट्रोलपंप कर्मचा-याला लुटले

यवतमाळ : पेट्रोलपंपावर झोपून असलेल्या कर्मचा-याला अर्जट पेट्रोल पाहिजे असा बहाना करून बाहेर बोलावले. त्यानंतर चाकुचा धाक दाखवुन रोख रक्कम लुटल्याची घटना दिनांक ८ फेब्रुवारी रोजी ३ वाजताच्या सुमारास विडूळ येथे घडली.

गजानन मारोती पाहुरकर वय ३३ रा. उमरखेड असे फिर्यादीचे नाव आहे. राम राजू मुलंगे वय २८ रा. विडूळ ता. उमरखेड असे आरोपीचे नाव आहे. दिनांक ८ फेब्रुवारी रोजी ३ वाजताच्या सुमारास फिर्यादी हा पेट्रोलपांवर झोपून होता. अशातच आरोपीने अर्जट पेट्रोल पाहिजे असा बहाणा करुन त्याला बाहेर बोलावले. यानंतर आरोपीने चाकुचा धाक दाखविला. फिर्यादीच्या जवळील २७ हजार ४०० रुपये जबरीने हिसकावुन नेले. या झटपटीत गजानन पाहुरकर याच्या पोटाला व हाताला चाकु लागला. या प्रकरणी उमरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरु आहे.

 

Post a Comment

0 Comments