वणी : प्रशांत जुमणाके
जिल्हा परिषद यवतमाळ द्वारा
जिल्हास्तरीय क्रीडा व कला स्पर्धेचे आयोजन दिग्रस येथे केले होते. ६ ते ११ वयोगटात लांब उडी या खेळप्रकारात पवन दिपक कष्टी या
विद्यार्थ्याने बाजी मारली आहे. आता तो जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
तो जिल्हा परिषद उच्च प्राथमिक सेमी इंग्रजी डिजिटल शाळा, चिखलगावचा विद्यार्थी आहे. पवन दिपक कष्टी याने ६ ते ११ वयोगटात
लांब उडी या खेळप्रकारात जिल्ह्यातून तृतीय क्रमांक पटकावला आहे. चिखलगावसह तालुक्याचा मान वाढवला आहे.
गावक-यांकडून पवनचा सत्कार
पवनच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षक आणि गावकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत
आहे. चिखलगावातील बोधे नगर येथे पवनचा सत्कार केला. यावेळी ग्राम पंचायत चिखलगावचे सदस्य संतोष राजूरकर, प्राथ.शाळा राजूरचे मुख्याध्यापक महेश लिपटे, विनोद पाचभाई, सुभाष
जगताप, दिपक कष्टी, दशरथ मांदाडे, देवेंद्र
लांबट, विनोद पारखी, सचिन कवाडे, सुरेश कनाके, श्याम कुत्तरमारे, रोहित
गेडाम, सुनील टोंगे, वैभव राजूरकर उपस्थित होते.
0 Comments