पोलीस कर्मचारी निलंबित

यवतमाळ : एका महिला पोलीस कर्मचा-यासोबत वाद करणा-या पोलीस कर्मचा-याला निलंबित करण्यात आले. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी निलंबित केल्याचे आदेश नुकतेच पारीत केले आहे.

मोहन चाटे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचा-याने नाव असून, उमरखेड पोलीस ठाण्यात पोलीस नाईक या पदावर कार्यरत आहे. पोलीस ठाण्यातील एका महिला कर्मचा-यासोबत वाद करुन मारहाण केल्याची घटना १४ फेब्रुवारी रात्री घडली होती. यावेळी काही पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनी चाटे याची समजुत काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेची नोंद पोलीस दैनंदिनीमध्ये करण्यात आली होती. पोलीस या शिस्तीच्या खात्यात सेवा करतांना नियमाची माहिती असतांना गैरकृत्य केले आहे. पोलीस विभागाची प्रतिमा मलिन झाली असून, कर्तव्यात कसुर केल्याचा ठपका ठेवून चाटे याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. निलंबन काळात पोलीस मुख्यालयात राहण्याचे आदेशात नमुद केले आहे.

अन् बदली केली रद्द

पोलीस नाईक मोहन चाटे हे यापुर्वी बिटरगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते. यावेळी त्याच्या कुटुंबात वाद निर्माण झाला होता. त्यावेळी तत्कालीन ठाणेदारांनी डीफॉल्ट रिपोर्ट वरिष्ठांना पाठविला होता. त्यावरुन बिटरगाव येथून मुकुटबन पोलीस ठाण्यात बदली केली होती. मात्र सदर बदली रद्द करून ते उमरखेड ठाण्यात रुजु झाले होते.  

Post a Comment

0 Comments