ढाणकी (यवतमाळ) :
भरधाव कार पलटी होवून कार चालक ठार झाला. तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना आज
रविवारी ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उमरखेड तालुक्यातील ढाणकी
नजीक महागाव फाट्याजवळ घडली.
शिवराज देशमुख रा. धानोरा
असे मृतकाचे नाव आहे. तर माधव गंगाराम काळे रा. धानोरा असे
जखमीचे नाव आहे. आज ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ते ए. एम. ०२ / सी. आर.
४२११ क्रमांकाच्या कारने धानोरा येथून ढाणकीकडे येत होते. अशातच महागाव
फाट्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार तीन ते चार वेळा पलटी झाली. या घटनेत ते
दोघे जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच बिटरगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठले.
यावेळी पोलीस व नागरिकांनी शिवराज देशमुख, माधव काळे या दोघांना ढाणकी येथील
प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र शिवराज देशमुख यांचा मृत्यू झाल्याचे
डॉक्टरांनी जाहिर केले. या घटनेने धानोरा गावात शोककळा पसरली आहे.
0 Comments