व्यावसायीकाचे घर फोडले : ४० ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास

यवतमाळ : कापड व्यावसायीकाचे घरफोडून ४० ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना आज ६ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास स्टेट बॅक ते वाघापूर नाका रस्त्यावरील अपर्णा अपार्टमेंट मध्ये घडली.

जितेंद्र गेलडा रा. अपर्णा अपार्टमेंट यवतमाळ असे फिर्यादीचे नाव असून, त्यांचे कापड दुकान आहे. नेहमी प्रमाणे आज ६ फेब्रुवारी रोजी जितेंद्र गेलडा व त्याची पत्नी आपल्या कापडाच्या दुकानात गेले होते. दुपारच्या सुमारास चोरट्याने घराच्या दाराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यानी ४० ग्रॅम सोन्याचे दागिणे चोरून नेले. गेलडा कुटुंब घरी परत आल्यानंतर चोरी झाल्याचे उघडकीस आले.  घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. श्‍वान पथक आणि फिंगर प्रिंट पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

 

Post a Comment

0 Comments