
यवतमाळ : गेल्या तीन दिवसापासून शांततेच्या आणि संविधानिक पद्धतीने नगर परिषद समोर धरणे आंदोलन सुरु आहे. मात्र नगर
परिषदसह प्रशासनाने या आंदोलनाची कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे दिनांक ८ फेब्रुवारी पासून आमरण उपोषण करण्याचा पवित्रा घेतला आहे.
या संदर्भातील निवेदनही मुख्याधिका-यांना
दिले आहे.
यवतमाळ शहरातील जाजु चौकातील भाजी व फळ विक्रेत्यांना
आठवडी बाजारात स्थालांतरण करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी नागरिक भाजी घेण्यासाठी येत
नाही. यामुळे भाजी विक्रेत्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शहिद विर भगतसिंग फळ
व भाजी विक्रेता संघटनेच्या वतीने जाजु चौकातच जागा देण्याच्या मागणीसाठी नगर पालिके
समोर धरणे आंदोलन सुरु कले आहे. आज या आंदोलनाचा तीसरा दिवस असून,
प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे नगर
प्रशासनाच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे. अखेर न्याय मागण्यासाठी
दि. ८ फेब्रुवारी पासून
आमरण उपोषण करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. या संदर्भात आंदोलकांनी
नगर परिषद मुख्याधिकारी यांची भेट घेवून निवेदन दिले. जागेच्या
संदर्भात तोडगा न निघाल्यास आणखी आक्रमक आंदोलन करु असा इशाराही दिला आहे. यावेळी अध्यक्ष सुरज खोब्रागडे, त्रिशूल मोकाटे,
नंदू काथोडे, खलीलभाई, टी
सी जावेद उपस्यांथित होते. उद्यापासून त्रिशूल माकोळे,
खलीद शेख, शैलेश फुलके, सलीम
शाह, इफेकार अहमद, राहुल मिश्रा,
गजू रामटेके, संजय गायकवाड, दादाराव गायकवाड, सैय्यद इमरान, राजू शाहा, केतन गावंडे, विशाल
स्थूल हे आमरण उपोषणास बसणार आहे.
0 Comments