‘शकुंतला’साठी तीर कमान आंदोलन करणार !

 बिरसा क्रांती दलाचा इशारा

यवतमाळ : ब्रिटीशांनीदिडशे वर्षापूर्वी यवतमाळ- मुर्तीजापूर शकुंतला रेल्वे सुरु केली होती. मात्र गेल्या काही वर्षापासून अचानक शकुंतला रेल्वे बंद करण्यात आली. सदर रेल्वे ब्रॉडगेज करुन सुरु करावी अशी मागणी बिरसा क्रांती दलाच्या वतीने करण्यात आली. अन्यथा तीर कमान आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भातील निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले आहे. याप्रसंगी बीरसा क्रांती दलाचे अध्यक्ष जीवन कोवें ,शरद चांदेकर, ओबीसी जन मोर्चा, भारतीय पीछडा शोषित संघटनेचे डॉ. विलास काळे, वासुदेवराव खेरडे, दिलीप बोरगमवार, गौतम बनसोड, मोरेश्वर वानरे, कमल खंडारे, उत्तमराव खंडारे, शुभम चांदेकर, गोविंद चव्हाण, प्रा. सविता हजारे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments