बारावीची परीक्षा : ३३ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

 सिसिटीव्हीचा राहणार ‘वॉच’

यवतमाळ : दिनांक ११ फेब्रुवारी पासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार असून, १८ मार्च पर्यंत  परीक्षा राहणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात १२६ परीक्षा केंद्र असून, ३३ हजार ६६३ विद्यार्थी परीक्षा देणार आहे. परिक्षेच्या काळात गैरप्रकार होवू नये म्हणून प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात येणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर सिसिटीव्हीचा वॉच राहणार आहे. परीक्षा केंद्रावर धाड टाकण्यासाठी स्वतंत्र पथकही तयार करण्यात आले आहे. १२६ केंद्र प्रमुखांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पोलीस पथकही तयार केले असून, प्रत्येक परीक्षा केंद्रावर १ पोलीस अधिकारी, २ होमगार्ड नियुक्त केले आहे. संवेदनशिल परीक्षा केंद्रावर पोलिसांचा ताफा राहणार आहे. शिक्षण विभागाच्या वतीने कॉपी मुक्त अभियान राबविण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments