यवतमाळ : यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी प्रमोद बगाडे यांची नियुक्ती करण्याता आली. त्या बद्दल यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन आज शुक्रवारी करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी सामाजिक कल्याण मंत्री शिवाजीराव मोघे, आमदार बाळासाहेब मांगुळकर, यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर, माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके, काँग्रेस कमिटीचे राज्य महासचिव तातू देशमुख उपस्थित होते. तसेच यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जितेंद्र मोघे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल ठाकरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, साहेबराव कांबळे, संजय ठाकरे आदी मान्यवरांनीही उपस्थिती लावून प्रमोद बगाडे यांचे अभिनंदन केले. यावेळी मान्यवरांनी युवक काँग्रेसच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करत युवा कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन अधिक बळकट करावे आणि काँग्रेस विचारधारा समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचवावी, असे आवाहन केले. तसेच प्रमोद बगाडे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेस अधिक सक्षम होईल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाला यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, युवक काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते आणि पक्षाचे निष्ठावान सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments