आई-वडील बाहेरगावी जाताच मुलाने केली आत्महत्या


 यवतमाळ : घरातील जिन्यावर दोर बांधून गळफास लावून एका १८ वर्षीय मुलाने आत्महत्या केली. ही घटना दारव्हा शहरातील व्यंकटेश कॉलनी येथे आज सोमवारी दि.३ फेब्रुवारीला सायंकाळी ७ चे दरम्यान उघडकीस आली.आयुष प्रमोद केळकर वय १८ वर्ष रा. व्यंकटेश कॉलनी दारव्हा असे मृतकाचे नाव आहे

आई वडील व भाऊ बाहेरगावी गेले होते. त्यामुळे घरी वृद्ध आजी व आयुष दोघेच घरी होते. दरम्यान आयुष प्रमोद केळकर याने घरातील जिन्यावर दोर बांधून गळफास लावून आत्महत्या केली.  ही घटना उघकीस येताच दारव्हा पोलिसांना माहिती देण्यात आली. यावेळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनाकरीता दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या मुलाने आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरु आहे.

Post a Comment

0 Comments