लग्न सोहळयात महिलेची पर्स चोरणारा अट्टल चोरटा जेरबंद

 

यवतमाळ : शहरातील एका मंगल कार्यालयातील लग्न सोहळ्यात महिलेची पर्स चोरून दागिणे चोरणा-या अट्टल चोरट्यास अवधूतवाडी पोलिसांनी जेरबंद केले. सदर चोरट्याकडून चोरी केलेल्या दागिण्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पवन ऊर्फ पुर्वेश पुडंलीक उईके वय ३९ वर्ष रा. तळदेव ता. महाबळेश्वर जि. सातारा ह.मु फुकट नगर जांब रोड यवतमाळ असे आरोपीचे नाव आहे. दि. २३ फेब्रुवारी रोजी रुख्मीणी मंगल कार्यालय, यवतमाळ येथे एका लग्न सोहळयात एका महीलेचे पर्स चोरी गेल्याची घटना घडली. पर्स मध्ये सोन्याचे दागीने व नगदी रोख असा एकुण ६८,६५० रु चा मुददेमाल लंपास केला होता. या प्रकरणी पोलीस स्टेशन अवधुतवाडी येथे अपराध क्रंमाक ३४५/२०२५ कलम ३०३ (२) भा.न्या. स अन्वये गुन्हा करण्यात आला. याप्रकरणी डी.बी. पथकाने आरोपी पवन ऊर्फ पुर्वेश उईके यास ताब्यात घेतले. सदर गुन्हयाबाबत चौकशी केली असता, चोरी केल्याची कबुली दिली. त्याचे कडुन गुन्हयात चोरी गेलेले सोन्याचा एक गोप व २ अंगठया असे दागिने, एक मोबाइल व नगदी ५००० रु असा एकुण ६५,६५० रु चा मुददेमाल जप्त करण्यात आला. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांचे नेतृत्वात सपोनि रोहीत चौधरी, सफौ गजानन वाटमोडे, सुरेश मेश्राम, पोलीस हवालदार विशाल भगत, बलराम शुक्ला, विकास मुंडे, रुपेश ढोबळे, पो.कॉ मोहम्मद भगतवाले, प्रशात पाटील, रशिद शेख, योगेश चोपडे यांनी केली.

 

Post a Comment

0 Comments