यवतमाळ : कोणी सांगते म्हणून व्यसन सोडू नका आपल्या कुटुंबाकडे पहा व व्यसनांचा त्याग
करा. व्यसनामुळे तुमचा जीव गेला तर तुमच्या मुलाबाळाची, पत्नीची होणारी आबाळ जरा आठवा. सर्वांच्या भल्यासाठी
सुंदर निरोगी जीवन जगण्यासाठी व्यसनाचा त्याग करा. सर्व संतांनी महामानवांनी मिळालेले
जीवन उत्तमरीत्या जगण्यासाठी आपणाला मार्ग दाखवला आहे. त्या मार्गावरच मार्गाक्रमण
केले तर आपली प्रगती शक्य आहे असे प्रतिपादन व्यसनमुक्ती सम्राट
मधूकर खोडे यांनी केले.
शिवजयंती उत्सव
समिती व राजे छत्रपती सामाजिक संस्था घाटंजीच्या वतीने दिला जाणारा वीर राजे संभाजी
पुरस्कार व्यसनमुक्ती सम्राट तथा प्रबोधनकार मधूकरराव खोडे यांना प्रदान
करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. प्रा. राजू तोडसाम होते. तर प्रमुख
अतिथी म्हणून पद्मश्री सुभाष शर्मा डॉ. अरविंद भुरे, सुरेश डहाके, मधुकर
काठोळे, आसाराम चव्हाण
उपस्थित होते. सामान्य ज्ञान स्पर्धा व वेशभूषा स्पर्धा शिव तीर्थावर पार पडली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण पार पडले.
यावेळी झी टीव्ही हास्य सम्राट फेम सिद्धार्थ खिल्लारे व वऱ्हाडी कवी
जयंत चावरे यांच्या धमाल विनोद विनोदी कार्यक्रमाने शिवजयंती उत्सवाची सांगता करण्यात
आली. दोन दिवस चाललेल्या शिवजयंती उत्सवाच्या विविध सत्रांचे संचालन दीपक महाकुलकर, रुपेश कावलकर, कुलदीप
डंभारे यांनी केले. तर प्रास्ताविक राजेश उदार यांनी केले. यशस्वीतेसाठी
राहुल खर्चे, अनिल मस्के, राजू गिरी, आकाश चिल्कावार, शरद सोयाम, भास्कर वेट्टी पुष्कर राऊत,
अंकुश सलाम यांचे सह आयोजन समितीने परिश्रम घेतले.
0 Comments