यवतमाळ :
दोन शेतात आग लागली असून, उस जळुन खाक झाला. यामध्ये दोन शेतक-यांचे लाखो रुपयाचे
नुकसान झाले. ही घटना आज १७ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास महागाव तालुक्यातील
काळी टेंभी येथे घडली.
महागाव
तालुक्यातील काळी (टेंभी) येथील शेतकरी सिनन्ना बंगु पवार यांची एक हेक्टर २० आर शेत आहे. सदर शेतात आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत 1
हेक्टर 20 आर ऊस जळून
खाक झाला आहे. तर सिनन्ना पवार याच्या शेजारीच असलेल्या अविनाश यलप्पा पवार या शेतक-याच्या शेतात आग लागुन 1 हेक्टर उसाची राख रांगोळी झाली.
शेती उपयोगी वस्तू खाक
आग
लागल्याने पीक जळून खाक झाले आहे. तसेच शेती उपयोगी
वस्तू जळून खाक झाले असून, यामध्ये
स्प्रिंकलर सेट व अन्य साहित्यांचा समावेश आहे. यामध्ये
शेतक-याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.
शॉर्टसर्किटमुळे लागली आग
अचानक लागलेल्या
अगीने रौद्ररूप धारण केले होते. दुपारच्या वेळी लागलेल्या आगीने गावकऱ्यांत एकच तारांबळ
उडाली. यावेळी गावकऱ्यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. महागाव तहसीलदार
अभय मस्के यांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी तातडीने दाखल झाले. शॉर्टसर्किटमुळे
आग लागल्याची माहिती तहसील प्रशासनाच्या चौकशी अहवालाद्वारे
मंडळ अधिकारी राम पंडित यांनी सांगिले.
उमरखेडचे अग्निशामक दल पाचारण
यावेळी गावकऱ्यांनी
आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले. मात्र आग आटोक्यात येत
नसल्याने उमरखेड येथून अग्निशामक दलाच्या वाहनास प्राचारण करण्यात आले
होते. महागाव तहसील प्रशासनाने दखल घेत तातडीने उपाययोजना केल्या होत्या. शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी होत आहे. प्रशासनाच्या वतीने अहवाल तयार करण्यात आला.
शेतात उस उभा
नॅचरल शुगर साखर
कारखान्याकडे अद्यापही अनेक शेतकऱ्यांचा ऊस गेला नाही. मागील झालेल्या विधानसभा निवडणुकीमुळे
लांबणीवर पडलेल्या ऊस तोडी कालावधीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन कराव
लागत आहे.
0 Comments