पोलिसांनी धाकधपट केली अन् इसमाचा झाला मृत्यू

 ‘त्या’ पोलिसांवर कारवाई करा : जाळपोळ करीत केला रास्तारोको

यवतमाळ : आर्णी पोलीस ठाण्यातील डी. बी. पथकाने दारु विक्रीचा आरोप करीत अंतरगाव येथील एका इसमाला ताब्यात घेतले होते. यावेळी पोलीस कर्मचा-यांनी धाकधपट केल्याने सदर इसमाला हृदय विकाराचा झटका येवून त्याचा मृत्यू झाला. ही घटना आर्णी येथे काल बुधवारी रात्री घडली. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करुन चार पोलीस कर्म-यावर कारवाई करावी या मागणीसाठी गावक-यांनी टायरची जाळपोळ करीत रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मांगीलाल रतन जाधव वय 35 वर्षों, रा. अंतरगांव ता. आर्णी असे मृतकाचे नाव आहे. २६ फेब्रुवारी रोजी  सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास आर्णी पोलीस स्टेशनच्या चार पोलीस कर्मचा-यांनी जाधव याच्या घरी धाड टाकुन घरझडती घेतली. त्यामध्ये काहीही हाती न लागल्याने पोलिसांनी धाकधपट करुन गावाबाहेर असलेल्या कोठ्यात नेले. त्या ठिकाणी सापडलेले दारुचे रिकामे पव्वे चुंबडीमध्ये घेवून दुचाकीने घेवून जात होते. अशातच अचानक मांगीलाल जाधव याच प्रकृती बिघडली. ही बाब लक्षात येताच त्याला आर्णी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. ईसीजी करुन प्रकृती चिंताजनक असल्याने  यवतमाळ येथे रेफर करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर वाहनाने यवतमाळकडे जात असतांना आर्णी पासून काही अंतरावर येताच वाटेतच मागीलाल याला हृदयविकाराचा झडका येवून श्‍वास बंद झाला होता. त्यामुळे पुन्हा आर्णी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. ऋषीकेश इंगळे व त्याचे सोबत असलेल्या तिन पोलीसांनी दारूची झडती घेतांना धाकधपट केली. त्यामध्ये मांगिलाल जाधव याला अटॅक सारखा आजार असल्याने मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करुन त्या चार पोलीस कर्मचा-यांची कार्यवाही करावी अशा आशयाची तक्रार मृतकाचा चुलत भाउ संतोष सोमला जाधव वय 45 रा. अंतरगाव याने आर्णी पोलीस ठाण्यात दिली आहे. सदर पोलिसांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जाळपोळ करुन रास्ता रोको

पोलिसांनी माराहण केल्याने इसमाचा मृत्यू झाल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे. या घटनेने गावात संतापाची लाट उसळली आहे. संतप्त जमावाने टायर पेटवुन जाळपोळ करीत रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सिआयडी पथक दाखल

या घटनेचे गांभीर्य पाहुन सिआयडी पथकही घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने पाहणी करुन चौकशी सुरु केली आहे. यामध्ये काय निष्पन्न होईल याकडे लक्ष लागले आहे.

पोलीस अधिक्षकांची भेट

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दारु विक्रेत्याचा मृत्यू झाला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांनी भेट दिली. या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्यात येईल असे आश्‍वस्त केले.

 

Post a Comment

0 Comments