कंत्राटदार डबघाईस : कंत्राटदारांचा सरकार विरोधात ‘एल्गार’

सोमवारी कंत्राटदार कल्याण संघटनेची सभा

यवतमाळ : शासनाच्या उदासीन धोरणामुळे आज कंत्राटदारांना बांधकाम व्यवसाय करणे कठीण झाले आहे. निधी वितरित केल्या जात नसल्याने कंत्राटदार डबघाईस आले आहे. आता सरकारविरुद्ध ’एल्गार’ करण्याचा पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी सोमवार दि. १० फेब्रुवारी रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक हॉटेल जसराज येथे सकाळी ११ वाजता होणार आहे.

पाच ते दहा टक्केच मिळतो निधी

मागील दोन वर्षापासून अर्थसंकल्पीय व इतर कामावर शासन पाच (५) ते दहा (१०) टक्केच निधी शासन वितरित करीत आहे. मागील पाच महिन्यात तर शासनाकडून कुठल्याही कामावर निधीच वितरित झालेला नाही. सर्व कंत्राटदारांनी कुठल्या ना कुठल्या बँकेतून वा खाजगी स्वरूपात कर्ज घेऊन शासकीय कामे पूर्ण केलेली वा प्रगतीत आहेत. शासनाच्या या उदासीन धोरणामुळे आज प्रत्येक कंत्राटदार आर्थिक डबघाईस आलेला आहे. या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष/ सचिव यांनी केले आहे.  

एकजुटीने लढा देणार !

यवतमाळ जिल्हा कंत्राटदार (कल्याण) संघटनेने महाराष्ट्रातील सर्व कंत्राटदार  संघटनेसह एकजुटीने लढा देऊन शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र हॉट मिक्स संघटना, महाराष्ट्र कंत्राटदार महासंघ, विदर्भ कंत्राटदार संघटना, महाराष्ट्र इंजिनिअर असोसिएशन व यवतमाळ जिल्हा कंत्राटदार( कल्याण) संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने निधी उपलब्धतेसाठी व आपली एकजुटीची ताकद शासनाला दाखवून देण्यासाठी ठोस निर्णय घेऊन पुढील दिशा ठरविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व संघटनेचे पदाधिकारी व कंत्राटदार यांची सभा यवतमाळ येथे आयोजित केलेली आहे.


Post a Comment

0 Comments