धम्मदेसनेसह बुध्द-भीम गीताचा कार्यक्रम; पु. भन्ते मिलिंद वाघोली यांच्या हस्ते होणार उद्घाटन
यवतमाळ
: बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन दिनांक ११ ते १२ फेब्रुवारीला
होणार आहे. महागाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रागंणात दोन दिवसीय
धम्म पदिषद होईल. दिनांक ११ फेब्रुवारी
रोजी सकाळी ९ वाजता पु. भन्ते धम्मदीक्षित वाराणशी यांचे हस्ते ध्वजारोहण होणार आहे. धम्म परिषदेचे
उद्घाटन पु. भन्ते मिलिंद वाघोली पुणे,
यांचे हस्ते होणार आहे. भन्ते सुबोध थेरो अन्य भिक्खू संघ उपस्थिती
राहणार असून ते धम्मदेसना देणार आहे अशी माहिती आयोजक सागर पाईकराव यांनी दिली. या
कार्यक्रमाचा बौद्ध उपासक
व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक व बौद्ध धम्म परिषद समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
बाल प्रबोधनकारासह
प्रसिद्ध गायक येणार
या धम्म परिषदेत येणाऱ्या
बौद्ध उपासकांसाठी भिक्खू संघाकडून धम्मदेसना व्याख्यानमाला आणि बुद्ध व भीम गीतांचा
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विषेश म्हणजे कोल्हापूर येथील आठवीत शिकत असलेली व अंतराष्ट्रीय बाल प्रबोधनकार प्रिया नप्ते येणार आहे. मुंबई
येथील सुप्रसिद्ध गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे, अशोक निकाळजे, अकोला
येथील गायीका रणजित गणेश जंजाळ, कुणाल
वैरागळे, तसेच बुलढाणा
येथील गायीका कल्पना खडेराय, माधव
वाढवे आंध्रा येथून बाल गायीका अंजली गडपायले,
गायक रंजीत शेजुळे यांची उपस्थिती राहणार आहे.
0 Comments