आरोपीसह दोन बालक ताब्यात ; ३ लाखांचा मुद्देमाल जप्त
दोन पथक केले तयार
गेल्या काही दिवसापासून कळंब शहरात दिवसा घरफोडीचे सत्र
सुरु होते. या
गुन्ह्याचा तपास करण्यासाठी उपविभागीय
पोलीस अधिकारी यवतमाळ व पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन कळंब यांनी पथक तयार केले होते. कळंब शहरात होणा-या घरफोडीचे आरोपी शोधण्यासाठी शहरातील
सिसिटीव्ही फुटेज तपासुन या गुन्ह्याचा छडा लावला.
तीन गुन्ह्याची कबुली
यवतमाळ शहर येथील मोगलीस गॅगचा आरोपी प्रथमेश
अनिल दोनाडकर वय १९ वर्ष रा. तलाव फैल यवतमाळ यास सखोल विचारपुस केली.
यावेळी त्याने दोन वि.सं.बा. साथीदारासह कळंब शहरात
३ घरफोड्या केल्याचे कबुल केले. त्यावरून कळंब शहरात दिवसा घरफोडी करणा-या आरोपींना ताब्यात घेतले. पो. स्टे. कळंब अपराध क. १) ७१२/२०२४ कलम ३३१ (३), ३०५ (अ) भारतीय न्याय सहींता, २) ०७/२०२५ कलम ३३१(३), ३०५ (अ)
भारतीय न्याय सहींता ३) १६/२०२५ कलम ३३१ (३), ३०५ (अ)
भारतीय न्याय सहींता, गुन्हयातील
चोरीस गेलेला दागीने, मोबाईल व
मोटर सायकल असा एकुण ३,६५,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाई करणारे पथक
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक यवतमाळ कुमार चिंता, अप्पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप,
उपविभागीय पोलीस अधिकारी यवतमाळ दिनेश
बैसाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश राठोड पो.स्टे. कळंब, पोउपनि सागर भारस्कर, पोहवा.
अंन्सार बेग,
पोशी
विकास कमनर, पोशी प्रविण उईके, नेमणुक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय यवतमाळ व पोशी योगेश
डोंगरे, पोशी गिरीश मडावी पो.स्टे. कळंब, यांनी केली आहे.
0 Comments