केंद्र संचालकांनीच केला मराठीचा पेपर व्हायरल

विस्तार अधिका-यांनी दिली पोलीसात तक्रार

मंचक गोरे / तहलका टाईम ऑनलाईन

यवतमाळ : माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणा-या दहावीच्या परिक्षेला आज शुक्रवार पासून सुरुवात झाली आहे. आज मराठी या विषयाचा पहिला पेपर सुरु होता. अशातच परिक्षा केंद्रावरील केंद्र संचालकानेच दहावीचा मराठीचा पेपर मोबाईलवर व्हायरल केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी विस्तार अधिका-यांनी महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, गुन्हा दाखल होण्याची कारवाई सुरु आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव पंचायत समिती अंतर्गत येणा-या आदर्श विद्यालय कोठारी येथे हा गैरप्रकार घडला आहे.

गटविकास अधिका-यांसह तहसीलदारांकडून चौकशी

दहावीची परिक्षेला आजपासून प्रारंभ झाला असून, आज मराठीचा पहिला पेपर होता. कोठारी येथील आदर्श विद्यालयात मराठीचा पेपर फुटल्याची माहिती शिक्षण विभागाला मिळाली होती. त्यावरुन महागाव येथील तहसिलदार अभय मस्के, विजय व्यंकटराव बेलेवाड विस्तार अधिकारी शिक्षण (परीरक्षक डि. सि ०६५ गटविकास अधिकारी) ज्ञानेश्वर टाकरस यांनी आदर्श विद्यालय कोठारी येथे १० वी चे केंद्राची पाहणी केली. परिक्षा केंद्राच्या सभोवताली लोकांची गर्दी दिसुन आली. त्यानंतर  व्हॉटसप वर प्राप्त झालेला फोटोच्या अनुषंगाने केंद्रसंचालक शाम कान्होजी तास्के यांच्या कार्यालयात पाहणी केली.

चाळामोळा केलेल्या प्रश्‍नपत्रिकेवरुन फुटले बिंग

कार्यालयातील पार्टीशन केलेल्या लगतच्या रुम मध्ये पाहिले. व्हॉटसपवर आलेल्या फोटो मधील खालच्या भागाशी मिळता जुळता पृष्टभाग सदरील रुममध्ये पाहावयास मिळाला. या संदर्भात केंद्रसंचालकांशी विचारणा केली असता, त्यानी असा प्रकार आमच्या कडे झालेला नाही असे सांगितले. परंतु तेथील उपस्थितीत विद्यार्थी एकु २२१ असल्यांने, प्रश्नपत्रिकेच्या गठ्यातील शिल्लक राहिलेले चार प्रश्नपत्रिका पैकी एक प्रश्नपत्रिका चोळा मोळा केलेली आढळुन आली. उर्वरित तिन प्रश्न पत्रिका जसाच्या तशा असल्यांचे निदर्शनास आले. यावरुन पेपर लिक केल्यांचे स्पष्ट झाले.

केंद्रसंचालका विरोधात तक्रार

केद्रसंचालक शाम कान्होजी तास्के यांची शासनाने १० वीच्या बोडाच्या परिक्षेसाठी आदर्श विद्यालय कोठारी येथे केंद्रसंचालक यानी नेमणुक केलेली होती. त्यानी सदर परिक्षेच्या प्रश्न पत्रिका त्याच्या ताब्यात असुन, सुध्दा त्यानी सदर मराठी प्रथम भाषा ०१ चा पेपर जनतेमध्ये मोबाईल व्दारे प्रसिध्द करुन इतर व्यक्तीना पुरविला आहे. तसेच आमच्या वरिष्ठाकडून माहीती मिळाली की, मोबाईल क्रमांक -९४०५११९७५२ या नंबर वरुन सुध्दा सदरचा मराठी विषयचा पेपर जनतेमध्ये १० वीच्या बोर्डाची परिक्षा सुरु असतांना, प्रश्न पत्रिका प्रसिध्द करण्यास मनाई असतांना, सुध्दा त्यानी मोबाईलव्दारे प्रसिध्द केले असल्याने पोलिसात तक्रार दाखल केली.

कारवाई सुरु : डॉ. जयश्री राउत

आदर्श विद्यालय कोठारी येथे झालेल्या गैरप्रकाराची चौकशी केली असून, महागाव तालुका स्तरावर कारवाई सुरु आहे. याप्रकरणी महागाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी सबंधित अधिकारी गेल्याची प्रतिक्रीया जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. जयश्री राउत यांनी दिली.

केंद्रसंचालकासह एका इसमावर गुन्हा

शिक्षण विस्तार अधिकारी विजय बेतेवाड यांनी लगेच या घटनेची तक्रार महागाव पोलीस स्टेशनला दाखल केली. त्यानंतर केंद्र संचालक श्याम तास्के आणि ही प्रश्नपत्रिका व्हायरल करणाऱ्या एका मोबाईल क्रमांक धारक आरोपी विरुद्ध महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९८२ कलम ५,६ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत अधिक चौकशी पोलीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments