बांधकाम सभापतीपदी जाकीर खान, सेना दोन, कॉंग्रेसकडे दोन समित्या
मुदत संपलेल्या
नगर पंचायतच्या विषय समित्याची निवढणूक आज पार पडली. सत्तापक्ष शिवसेना - कॉंग्रेस
- राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्ताधारी पक्षाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व निर्माण केले.
सकाळी ११ वाजता विषय समिती सदस्य ठरविण्यात आले. त्यसानंतर विषय समिती निश्चीत करण्यात
आली आहे. त्यानुसार सर्व विषय समित्याचे सभापती पदाचे उमेदवार यांचे नामनिर्देशन पत्र
दाखल करण्यात आले. दुपारी तीन नंतर निवडणुक प्रकिया घेण्यात आली. बांधकाम सभापतीसाठी दोन अर्ज आल्याने बांधकाम पदासाठी निवडणूक घेण्यात
आली. यामध्ये जाकीर खान यांना अकरा मते तर अमर शिरसाट यांना पाच मते मिळाले आहे. यात जाकीर खान यांना 11 मते
मिळाल्याने त्यांना विजय घोषित करण्यात आले. बाकी विषय समित्यावर नामनिर्देशीत पत्र
एक-एकच आल्याने निवड अविरोध झाली.
निवडणुकी निर्णय अधिकारी
निवडणूक निर्णय
अधिकारी म्हणून दारव्हा उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी, मुख्याधिकारी डॉ. पल्लवी सोटे, श्रीगणेश चोधरी महसुल सहाय्यक दारव्हा
,योगेश सूर्यवंशी, गौरव गोटफळे निवडणूक प्रकिया पार पाडली.
उपस्थित पदाधिकारी
यावेळी अध्यक्षा संगिता मालखुरे,
उपाध्यक्ष श्याम जगताप,
शिवसेना अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख शब्बीर खान, तालुका प्रमुख वसंता जाधव,
कॉंग्रेस तालुकाध्यक्ष मोहन बनकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष रमेश मोते, राष्ट्रवादीचे गटनेते शे अहेमद,
नगरसेविका मदीना परविन शब्बीर खान, रेणुका अंकुश
सोयाम, मंदाकीनी रमेश
मोते, लता उत्तम मनवर, अक्षय राऊत, प्रदिप नांदुरकर, अंकुश सोयाम, अभिषेक
मालखुरे, नईम खान, गोलू मनवर, अल्बक्ष खान
आदी उपस्थित होते .
0 Comments