प्राजक्ता लखूजी डुकरे असे निवड झालेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. प्राजक्ता हिने शालेय व महाविद्यालयीन शिक्षण झाडगाव येथील 'श्री.लखाजी महाराज महाविद्यालयात' पूर्ण केले. त्यानंतर तीने स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मंत्रालयीन
लिपिक टंकलेखक या पदासाठी २०२३ मध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता व सामान्यज्ञान आदी विषयाचा समावेश असलेली पूर्व व मुख्य
अशा दोन टप्प्यात लेखी परीक्षा, तर मराठी
व इंग्रजी विषयाच्या व्यावसायिक टंकलेखनसाठी प्रात्यक्षिक परीक्षा घेतली होती. या सर्व
टप्प्यातून यशस्वीपणे मार्गक्रमण करीत नुकत्याच
आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) महिला उमेदवार
म्हणून यशस्वी उमेदवारांच्या यादीत आपले स्थान मिळवले आहे. बद्दल तिचे सर्व स्तरातून
कौतुक होत असून याचे श्रेय तिचे आई-वडील,
तिच्या सहकारी मैत्रीणीना देते.
अपयशाने खचून जावु नका
"यापूर्वीही विविध विभागांच्या परीक्षांमध्ये यश मला थोडक्यात हुलकावणी देऊन गेले. मात्र, अशा अपयशाने खचून न जाता आणि नैराश्याला बाजूला सारून, अधिक उत्साह आणि नव्या उमेदीने पुढील तयारीला लागणे गरजेचे आहे." स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या परीक्षार्थींना ती प्रेरणादायी सल्ला देत म्हणते की, "अपयश हे अंतिम सत्य नसून, ते यशाच्या मार्गातील एक टप्पा आहे. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर यश निश्चितच मिळते अशी प्रतिक्रीया प्राजक्ता डुकरे हीने दिली.
0 Comments