जोधळणी शिवारातील घटना : आरोपी जेरबंद
यवतमाळ : शेतात नवरा बायकोचे सुरु
असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या इसमाची धारदार शस्त्राने वार करुन हत्या
करण्यात आली. ही घटना ५ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास कळंब दत्त
रोडवरील जोंधळणी शेत शिवारात उघडकीस आली.
ज्ञानेश्वर आनंदा मोहदे वय 52 वर्ष रा पारवेकर नगर कोलाम पोड कळंब असे
मृतकाचे नाव आहे. तर रवी गजानन आमजोर 27 वर्ष रा. दुर्ग असे आरोपीचे नाव आहे. मृतक ज्ञानेश्वर मोहदे
हे सालगडी व शेत राखणदार म्हणून जोंधळणी शेत शिवारातील बंड्यावर
काम करत होते. तर शेताच्या बाजूलाच शेख अन्सार कुरेशी यांचे शेत असून
तेथे गजानन आमजोर रा. दुर्ग हा सालगडी राखणदार
म्हणून काम करत होता. 5 फेब्रुवारी
रोजी संध्याकाळी 8 ते 8.30 च्या दरम्यान त्यांचा गजानन आमजोर
याचा मुलगा आरोपी रवी आमजोर व त्याची पत्नी याच्यात माहेरी का गेली या कारणावरून भांडण सुरु होते. सदर भांडणाचा आवाज गेल्याने ज्ञानेश्वर हा भांडण सोडविण्यासाठी गेला होता. यावेळी आरोपीने धारदार शस्त्राने ज्ञानेश्वर याच्यावर वार
केले. जखमी ज्ञानेश्वरला कळंब येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी
त्याचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले. मृतकाचा मुलगा सागर ज्ञानेश्वर मोहदे
वय 26 वर्ष याने कळंब
पोलीस ठाणे गाठुन फिर्याद दिली. त्यावरुन कळंब पोलिसांनी आरोपी रवी गजानन आमजोर
याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून,
आरोपीला अटक केली. घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, उपविभागीय
पोलीस अधिकारी दिनेश बैसाणे यांनी भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक
राजेश राठोड यांचे मार्गदर्शनात पीएसआय सागर भारस्कर, महेंद्र साळवे करीत आहे.
0 Comments