एलसीबीची कारवाई : झारखंड पोलिसांच्या दिले ताब्यात
तुलसी उर्फ दिलीप
जेठू महतो वयः ४७ वर्षे झारखंड असे अटक केलेल्या नक्षली नेत्याचे नाव आहे. गेल्या दोन
महिन्यापूर्वी तुलसी उर्फ दिलीप महतो हा झारखंडमधून पळून यवतमाळ जिल्ह्यात
लपल्याची माहिती मिळाली होती. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस
अधीक्षक कुमार चिंता यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यांना संशयितावर गुप्तपणे
नजर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञान व स्थानिक सूत्रांच्या मदतीने
आरोपीला पांढरकवडा, उमरी येथील एका
स्टोन क्रशर परिसरात असल्याची माहीती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचुन सदर
नक्षली नेत्याला अटक केली.
आधारकार्ड व ड्रायव्हींग लायसन्स बनावट
संशयिताने बनावट आधारकार्ड सादर करून खोटी ओळख देवुन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्या संशयास्पद वर्तणुकीमुळे त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. संशयीताकडे कठोर चौकशी केल्यानंतर, आरोपीने स्वतःची खरी ओळख आणि नक्षलवादी कारवायांमधील सहभाग असल्याचा मान्य केला.
१९९३ मध्ये नक्षली गटात भरती
तुलसी उर्फ दिलीप जेठू महतो वय ४७ वर्षे हा 1993 मध्ये झारखंडमधील नक्षली गटात भरती झाला. त्यानंतर 1997 मध्ये त्याची पदोन्नती झाली असून, 'भितीया दलम' चा विभागीय कमांडर म्हणून नियुक्ती व १२ सशस्त्र नक्षलवाद्यांचे नेतृत्व मिळाले आहे. गुन्हेगारी कारवाया सुरक्षा दलांवर हल्ले, खंडणी, सरकारी मालमत्तेची तोडफोड अशा अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग होता.
अन् दलम कमांडरसोबत वाद
जमा करुन आणलेल्या पैशातून ५० हजार रुपये दलम कमांडरला कमी दिली. त्यावरुन दलम कमांडर व तुलसी सोबत वाद झाला. सन २००० मध्ये हा वाद झाला असून, आता आपला गेम होणार या भितीने तो तेथून पळून आला.
मुंबईसह यवतमाळात केली मजुरी
नक्षली नेता तुलसी याने २००४ मध्ये मुंबई गाठली. त्या ठिकाणी तो मजुर म्हणून काम करीत होता. त्या ठिकाणीही असुरक्षित असल्याचे वाटल्याने तेथून यवतमाळ जिल्हा गाठला. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव, पारवा या ठिकाणी काही काळ राहीला. त्यानंतर त्याने यवतमाळ गाठले. या ठिकाणी तो मजुरीचे काम करुन आपला उदनिर्वाह करीत होता. तब्बल २० वर्षापासून तो यवतमाळ जिल्ह्यात राहत होता.
तुलसीच्या शिरावर गंभीर गुन्हे
झारखंड पोलिसांच्या
नोंदीनुसार, तुलसी उर्फ दिलीप
जेठू महतो हा किमान सात गंभीर गुन्ह्यांमध्ये नोंद आहे. पोलीस ठाणे मंडू
अप क.. २२४ / १९९९ कलम ३०७,
३५३, ४३५, ४४० भादवि. सह कलम २७ शस्त्र अधिनियम आणि ३/४ स्फोटक पदार्थ अधिनियम. पोलीस ठाणे विष्णुगड अप.क. ६/ १९९८ कलम
३७९, ४११, १२० (ब) भादवि, सह कलम
३० (ii) कोळसा खाण अधिनियम
आणि सह कलम ३३ भारतीय वन अधि., पोलीस ठाणे सदर अप क. १७/९८ कलम ३७९, ४११ भादवि. कलम ३० (ii)
कोळसा खाण अधिनियम आणि कलम ३३ भारतीय वन अधिनियम. पोलीस ठाणे चौपराण
अप क. १/९८ कलम ३७९, ४११, १२० (ब), ४१४ भादवि, कलम ३० (ii) कोळसा खाण अधिनियम. पोलीस ठाणे चर्चु अप क. १/९९ कलम २१६
भादवि सह कलम १७ सीएलए अॅक्ट, पोलीस ठाणे चर्चा अप क. ३/९९ कलम
३०२, २०१, १२०(ब), ३४ भादवि. अंतर्गत
गुन्हे दाखल केले आहे.
नक्षली नेत्याला दिले झारखंड पोलीसांच्या ताब्यात
आरोपीच्या कबुलीजबाबाची आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची पुष्टी करण्यासाठी, यवतमाळ पोलिसांनी झारखंड पोलिसांशी तात्काळ समन्वय साधला. पोलीस अधीक्षक हजारीबाग आणि ठाणे प्रभारी अधिकारी, पोलीस स्टेशन अंगो यांचेकडुन तुलसी उर्फ दिलीप महतो याचे ओळखीची आणि गुन्हेगारी इतिहासाची पडताळणी करण्यात आली. पुढील कारवाईसाठी सदर आरोपीला झारखंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
कारवाई करणारे पथक
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता (भापोसे) आणि अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि. गजानन राजमलु, पोलीस अंमलदार सैयद साजीद, बंडु डांगे, रवि नेवारे, रुपेश पाली, योगेश डगवार, आकाश सुर्यवंशी, राजकुमार कांबळे, देवेंद्र होले, योगेश टेकाम, धनंजय श्रिरामे, महेश वाकोडे या पोलीस पथकाने महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
0 Comments